शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी २९ रोजी विदर्भात

By admin | Updated: April 28, 2015 02:33 IST

भूमी अधिग्रहण विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत

‘किसान पदयात्रा’ काढणार : काँग्रेस पदाधिकारी संभ्रमातनागपूर : भूमी अधिग्रहण विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत. यासाठी ‘किसान पदयात्रा’ काढणार असून, याची सुरुवात ते विदर्भातून करणार आहेत. या पदयात्रेसाठी राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन होणार आहे. रात्री नागपुरात मुक्काम करून ३० रोजी ते अमरावती येथे रवाना होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन होईल. विमानतळावरून कडेकोट सुरक्षेत त्यांचा ताफा रविभवनला पोहोचेल. रविभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम असेल. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते अमरावतीसाठी रवाना होतील. ते हेलिकॉप्टरने जातील की रस्तामार्गे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे अमरावती येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अद्याप याबाबत कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. नागपूर शहर पदाधिकाऱ्यांना मात्र प्रदेश काँग्रेसकडून राहुल गांधी २९ ला रात्री नागपुरात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र, ते ३० एप्रिल रोजी कुठे जातील, याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे २९ एप्रिल रोजी दुपारीच नागपुरात दाखल होत आहेत. राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्याचा निश्चित कार्यक्रम अद्याप प्रदेश काँग्रेसकडे आलेला नाही. मंगळवारी दुपारपर्यंत दौऱ्याचा कार्यक्रम येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दौऱ्याची तारीख, वेळ व ते कुठे कुठे जाणार आहेत, हे स्पष्ट होईल.- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस