शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

'क्वारंटाईन'केंद्र की 'पिकनिक'चे स्थळ? : 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:09 IST

लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे.

ठळक मुद्दे संशयितांचे राहणे, खाणे सोबतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’वर अद्यापही लस किंवा औषध निघाले नसल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच प्रभावी उपाय मानण्यात येत आहे. विशेषत: ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्यांनी तर याचे पालन करणे अनिवार्यच आहे. परंतु लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे. एकमेकांच्या थाळ्यांमध्ये जेवण करणे, गच्चीवर एकत्रित येऊन गप्पा हाकणे असे प्रकार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असूनदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे ‘क्वारंटाईन’ केंद्र आहे की सहलीचे ठिकाण, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.लोणारा येथील एका महाविद्यालयात ‘क्वारंटाईन’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. येथे एकूण ११६ संशयित ठेवण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. येथील बºयाच लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’देखील निघाली. ‘कोरोना’चा संसर्ग लवकर होतो, हे माहिती असूनदेखील हे सर्व लोक एकत्रितच राहत आहेत. सायंकाळच्या सुमारास तर बहुतांश जण इमारतीच्या गच्चीवर एकत्रित येतात व गप्पांचा फड रंगतो. याशिवाय अनेक जण सोबतच बसून जेवण करत आहेत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीला लागण झालेली नाही, त्यालादेखील संसर्ग होण्याचा धोका आहे.सोमवारी या केंद्रातून ७० हून अधिक जणांना सोडण्यात आले. तर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्यांना उपचारासाठी नेण्यात आले. तर दोन आणखी केंद्रात लोक दाखल झाले. सद्यस्थितीत येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेले ३९ लोक आहेत.गंभीर कधी होणार?शहरात ‘कोरोना’बाधितांची संख्या शंभरच्या जवळ पोहोचली आहे. अशा स्थितीत ‘क्वारंटाईन’ असलेल्यांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु लोणारा येथील केंद्रातील प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. प्रशासन यासंदर्भात गंभीर कधी होणार तसेच लोकदेखील स्वत:ची जबाबदारी कधी ओळखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्मचारीदेखील धोक्यातलोणारा येथील केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविण्यात आलेली नाही. इतर ‘क्वॉरंटाईन’ केंद्रात रात्रपाळीत असलेल्यांसाठी झोपण्यासाठी सोय आहे. लोणाऱ्यात तीदेखील सोय नाही. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावर झोपावे लागत आहे. शिवाय अर्ज भरुन घेण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थमा व ह्रद्यविकाराची समस्या आहे. मात्र तरीदेखील त्यांनाच सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर