प्रा. आ. केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:30+5:302021-04-19T04:08:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच काेराेना संक्रमणामुळे कामाचा ताण वाढल्याने ...

Pvt. Come on. Lack of staff at the center | प्रा. आ. केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता

प्रा. आ. केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच काेराेना संक्रमणामुळे कामाचा ताण वाढल्याने एकीकडे कर्मचाऱ्यांची फरफट हाेत असून, दुसरीकडे रुग्णांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे ही समस्या साेडविण्याची व या आराेग्य केंद्रात औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खापा शहराशी परिसरातील काही गावांमधील नागरिकांचा सतत संपर्क येताे. त्यामुळे खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात राेज उपचाराला येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. यात बहुतांश रुग्ण गरीब आहेत. काेराेना संक्रमणामुळे या आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. वारंवार मागणी करूनही या आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदी भरण्यात आली नाही. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचारी चिडचिड करीत असून, याच प्रकारामुळे त्यांचा रुग्ण अथवा रुग्णांच्या कुटुंबीयांशी अधूनमधून वादही उद्भवतात.

या आराेग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण हाेत असल्याने डाॅक्टर रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करण्याचा सल्ला देतात. काही रुग्णांना नाईलाजास्तव खासगी डाॅक्टरांकडून उपचार करवून घ्यावे लागतात. या आराेग्य केंद्रात साेनाेग्राफीची साेय नसल्याने रुग्णांना साेनाेग्राफी करण्यासाठी सावनेर अथवा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात किंवा खासगी लॅबमध्ये जावे लागते. त्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंडही साेसावा लागताे. परिणामी, काेराेना संक्रमण लक्षात घेता, या आराेग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी खापा शहरासह परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pvt. Come on. Lack of staff at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.