‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:00 IST2018-02-21T23:55:29+5:302018-02-22T00:00:32+5:30
विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे.

‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे.
विशेष समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील.
विदर्भातील ५० यशस्वी प्रोफेशनल्सनी कथन केलेला जीवनातील सुख-दु:खाचा प्रवास कॉफी टेबल बुकमध्ये मांडला आहे. त्यांच्यापासून कुणीही प्रेरणा घ्यावी, असे त्यांचे अनुभव आहेत. त्यांच्या जीवनातील यशस्वीतेच्या नोंदी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. सर्व मान्यवरांची निवड ज्युरींनी केली आहे. यशस्वी प्रोफेशनल्समध्ये पुरुष आणि महिला डॉक्टर, वकील, शैक्षणिक तज्ज्ञ, उद्योजक, शेफ, हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे.