नागपुरातही अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 21:54 IST2022-11-07T21:54:00+5:302022-11-07T21:54:29+5:30
Nagpur News खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

नागपुरातही अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध
नागपूर : खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले. नागपुरातही त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सत्तारांचा जाहीर निषेध करण्यात आला. अब्दुल सत्तार यांचा कृषी मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा त्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या निषेध आंदोलन डाॅ. जानबा मस्के, जावेद हबीब, रमन ठवकर, वर्षा शामकुळे, नूतन रेवतकर, लक्ष्मी सावरकर, अब्दुल फारुकी, शैलेंद्र तिवारी, अरविंद भाजीपाले, रवि पराते, महेंद्र भांगे, प्रशांत बनकर, राजेश पाटील, राजा बेग, आशुतोष बेलेकर, पिंकी शर्मा, राकेश बोरीकर, अमोल पारपल्लीवार, देवेंद्र घरडे, सुनील लांजेवार, अनिल बोकडे, कपिल आवारी आदी सहभागी होते.