शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती करणारेच झाले शिकार

By admin | Updated: January 14, 2017 02:35 IST

नायलॉन मांज्याच्या विरोधात जनजागृती मोहिमेवर असलेले सामाजिक कार्यकर्ते मांज्याच्या शिकार ठरले.

दुपट्ट्यामुळे वाचला जीव : मांजामुळे विद्यार्थ्याचाही कापला अंगठा नागपूर : नायलॉन मांज्याच्या विरोधात जनजागृती मोहिमेवर असलेले सामाजिक कार्यकर्ते मांज्याच्या शिकार ठरले. मानेला दुपट्टा गुंडाळल्यामुळे जीवघेणा अपघात टळला. जुनी शुक्रवारी परिसरातील पतंग बाजाराच्या अगदी समोर ही घटना घडली. तर दहीबाजार इतवारी पुलावर दुचाकीवर जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मांज्यामुळे अंगठा कापला. अरविंद रतुडी आणि संजय पंचभाई हे आपल्या साथीदारांसह किंग कोबरा आॅर्गनायझेशनच्या माध्यमातून नायलॉन मांजाच्या विरुद्ध जनजागृती अभियान चालवितात. शुक्रवारी सकाळी रतुडी आणि पंचभाई यांनी नंदनवन आणि सक्करदरा परिसरातील शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती केली. त्यानंतर दोघेही दुपारी १.३० वाजता दुचाकीने सक्करदरा येथून जुनी शुक्रवारीकडे जात होते. यादरम्यान दुचाकी चालवित असलेल्या संजय पंचभाई यांच्या गळ्याला नायलॉन मांजाने विळखा घातला. पंचभाई यांनी हेल्मेटसह मांजापासून बचावासाठी गळ्यात दुपट्टा घातला होता. मांज्याने दुपट्ट्याला काप घेत, काही समजण्याापूर्वीच त्यांचा गळा चिरला गेला. मागे बसलेल्या रतुडी यांनी मांजा तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोघेही वाहनावरून खाली पडले. त्यांच्या मागूनच मिनिडोर येत होती. दोघेही खाली पडल्याने मिनिडोर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेली वाहने एकमेकांना धडकली. पंचभाई व रतुडी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. बाईकची गती अधिक नसल्याने आणि गळ्यात दुपट्टा असल्याने पंचभाई यांचा जीव वाचला. दुसरी घटना दहीबाजार पुलावर घडली. नवीन बगडगंज, लकडगंज पोलीस स्टेशन जवळील अतुल देवीदास मूल हा विद्यार्थी आपल्या दुचाकीने स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. राममनोहर लोहिया वाचनालयात पुलावरून जात होता. पुल उतरत असताना नायलॉन मांज्या त्याच्या मानेजवळ आला. मांज्या अडविण्याच्या प्रयत्नात अतुलचा अंगठा कापला गेला. त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून सर्जरी करण्यास सांगितले.(प्रतिनिधी)