शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यातील पीएसआयची गुंडागर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:30 PM

पोलीस स्टेशनसमोर वाहन पार्क करण्यावरून इमामवाड्यातील पीएसआयने विदेशी पाहुण्यांसोबत असभ्य वर्तन करीत गुंडागर्दी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपार्किंगवरून शिवीगाळ : विदेशी पाहुण्यांशी असभ्य वर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस स्टेशनसमोर वाहन पार्क करण्यावरून इमामवाड्यातील पीएसआयने विदेशी पाहुण्यांसोबत असभ्य वर्तन करीत गुंडागर्दी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नवनाथ पाटवदकर असे या पीएसआयचे नाव आहे. रविवारी नागपुरात आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. याकार्यक्रमासाठी थायलंड, बांगलादेश व म्यानमार येथील प्रतिनिधी सहभागी होण्यासाठी आले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था इमामवाडा पोलीस स्टेशनसमोरील हॉटेल तयबा येथे करण्यात आली आहे. रविवारी सामाजिक कार्यकर्ते आणि या परिषदेचे आयोजक असलेले नितीन गजभिये हे या विदेशी पाहुण्यांना घेऊन कारने हॉटेलात आले. घाटरोडवर सध्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. हॉटेलसमोरच रस्त्याचे काम सुरू असल्याने गाडी ठेवायला जागा नाही. हॉटेलमध्ये येणारे लोकही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच म्हणजे पोलीस स्टेशनसमोरच वाहन पार्क करतात. गजभिये यांनीही तिथेच कार पार्क करण्याचा प्रयत्न केला. यावरून पीएसआय पाटवदकर यांचा पारा चढला. त्यांनी शिवीगाळ करीत गाडी हटविण्यास सांगितले. त्यावेळी कारमध्ये थायलंड येथील बौद्ध भंतेही बसले होते. गजभिये आणि त्यांच्या एक महिला साथीदार यांनी पीएसआयला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पुन्हा उद्धट उत्तर देत गजभिये आणि महिलेला ताब्यात घेत त्यांच्या जवळचे मोबाईल जप्त केले. नितीन गजभिये यांनी घडलेला हा प्रकर नंतर पत्रपरिषदेत विशद केला. पीएसआयने त्यांना बेल्टने मारहाणसुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांची ही गुंडागर्दी असून याविरुद्ध आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपाइंचे प्रकाश कुंभे यांनीसुद्धा या घटनेचा निषेध करीत पीएसआयला निलंबित करण्याची मागणी केली. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी गजभिये यांनीच पोलिसांशी वाद घातल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस