खासदार राऊत यांना सुरक्षा द्या; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2024 17:40 IST2024-12-20T17:39:31+5:302024-12-20T17:40:02+5:30

संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. 

Provide security to MP Raut Aditya Thackerays demand to the Chief Minister | खासदार राऊत यांना सुरक्षा द्या; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार राऊत यांना सुरक्षा द्या; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंगेश व्यवहारे, नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केली. त्या दोघानांही लवकरात लवकर अटक करण्यात यावी. तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. 

आपण दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटलात याचे कारण काय, असे विचारला असत्या त्यांनी उपरोक्त माहिती दिली. संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्याकरीता दोन युवक मोटरसायकलने आले होते. ते कशासाठी आले होते. त्यांचा उद्देष काय होता, याची पोलिसांनी त्वरीत तपास करून त्यांना अटक करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. ते म्हणाले,‘आम्ही या सत्रात वेगवेगळे विषय मांडून चर्चा करत असतो. एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असतो. मात्र, कधी या टोकापर्यंत राजकरण पोहचले नव्हते.  आज काही लोकांनी संजय राऊत यांच्या घराची रेकी केली. मागील काही दिवसात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. विविध घटना घडताहेते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने पुढील पाच वर्षांत अनेक भेटी होतील ही अपेक्षा आहे. सत्ताधारी आणि विरोधी एकत्र येऊन ज्या घटना घडत आहे यावर उपाययोजना व्हायला हव्यात. दोन्ही बाजू मिळून कार्य करतील तर सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण होईल.’  

मागचे मुख्यमंत्री काँट्रॅक्ट बेसवरील
मागचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आणि काँट्रॅक बेसवरील मुख्यमंत्री होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

Web Title: Provide security to MP Raut Aditya Thackerays demand to the Chief Minister