शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

नागपुरात जीएसटी विरोधातील व्यापाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 2:22 PM

Nagpur News देशातील आठ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले होते. बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्दे शनिवार, रविवार दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमजीएसटी कायद्यात शिक्षेची तरतूद

 लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदी रद्द कराव्यात, इंधन दरवाढ मागे घ्यावी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे ई-वे बिल सादर करण्याच्या मागणीसाठी देशातील आठ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले होते. बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपुरातील काही बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या, तर काही अंशत: सुरू होत्या. शनिवार व रविवारी बाजारपेठा बंद राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला होता.

जीएसटीच्या जाचक अटी त्रासदायक असून त्याचा विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध करावा आणि व्यापाऱ्यांच्या एकजुटीचा संदेश सरकारपर्यंत जाण्यासाठी व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विविध बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना केले. बंदमध्ये इतवारी किराणा ओळ, मस्कासाथ, भांडे ओळ, इतवारी सोने-चांदी ओळ, महाल, सीताबर्डी आदी बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. सक्करदरा भागातील दुकाने सुरू होती.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, देशभरातील वाहतूकदार, हॉकर्स, लघु उद्योग आणि महिला उद्योजिका बंदच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरल्या. कॅटच्या बंदमध्ये देशभरातील ४० हजारांपेक्षा जास्त व्यापारी संघटनांशी जुळलेले ८ कोटींपेक्षा जास्त व्यापारी सहभागी झाले होते.

जीएसटी कायद्यातील नियमांमध्ये सरकारने केलेले संशोधन आणि ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्यांना सूट दिल्याने किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय हळूहळू संपुष्टात येणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीपासून किरकोळ व्यवसायावर संकट आले आहे. आता कुठे व्यवसाय रूळावर येण्यास सुरुवात झाली होती. पण यंदाही कोरोनाची दुसरी लाट आल्याने व्यावसायिकांवर पुन्हा नव्याने संकट आले आहे. शुक्रवारच्या बंद आंदोलनानंतर शनिवार आणि रविवारी दुकाने बंद राहणार असल्याचा फटका व्यावसायिकांना बसणार आहे. कोरोना महामारी आणि विविध करांच्या बोझ्यामुळे किरकोळ व्यापारी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदींचा एकजुटीने विरोध करण्यासाठी चेंबरने बंदमध्ये सहभाग नोंदविला. सर्व किरकोळ व्यापाऱ्यांनी चेंबरच्या आवाहानार्थ दुकाने बंद ठेवली. इतवारी शहीद चौकात व्यापाऱ्यांची सभा घेऊन त्यांना जीएसटी तरतूदींची माहिती देण्यात आली.

नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, जीएसटी नोंदणीकृत सराफांनी बंद पाळून दुकाने बंद ठेवली. जीएसटी नोंदणीकृत नसलेली दुकाने सुरू होती. जीएसटीच्या कठोर तरतूदींचा सर्वांनाच त्रास होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते.

नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, बहुतांश बाजारपेठांमधील किराणा दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले. शनिवार व रविवारी दुकाने बंद राहणार असल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

टॅग्स :businessव्यवसायBharat Bandhभारत बंद