कर्नाटक बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा नागपुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 21:55 IST2022-02-22T21:54:29+5:302022-02-22T21:55:09+5:30
Nagpur News शाळेत हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. याविरोधात नागपुरात बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा नागपुरात निषेध
नागपूर : शाळेत हिजाब घालण्याला विरोध करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यांची कर्नाटकमधील शिमोगा येथे हत्या करण्यात आली. याविरोधात नागपुरात बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. बडकस चौकात झालेल्या विरोध प्रदर्शनात जिहादी मानसिकतेचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वाददेखील झाला व त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.
शाळांमध्ये नियमाप्रमाणे गणवेश घातलाच पाहिजे यासाठी कर्नाटकमध्ये आंदोलन सुरू होते व त्यात सहभागी झालेल्या हर्षा या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. अशा प्रवृत्तींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी बजरंग दल कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली. पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी प्रांत मंत्री गोविंद शेंडे , मनीष मौर्य, महानगर संयोजक विशाल पुंज, प्रशांत मिश्र, रजनीश मिश्रा, ऋषभ अरखेल, लखन कुरील, संकेत आंबेकर, रवी वानखेड़े, योगेश वाकडे, अभिषेक गुप्ता, रवी पाटील, उमंग दडवे, कुणाल राघवानी, निहाल गोपचे प्रामुख्याने उपस्थित होते.