शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पाेलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कंबर कसली असून, तालुक्यात विविध ठिकाणी धाड टाकून १२ आराेपींना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : पाेलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कंबर कसली असून, तालुक्यात विविध ठिकाणी धाड टाकून १२ आराेपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अंदाजे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गाेंडेगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर पाेलिसांनी धाड टाकून आराेपी प्रभाकर पाटील, भीमराव कडबे (दाेन्ही रा. नरखेड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून माेहफुलाचा सडवा व दारू काढण्याच्या साहित्यासह २९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच पिठाेरी शिवारात केलेल्या कारवाईत आराेपी श्रावण भारसाकडे (रा. पिठाेरी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून माेहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व (एमएच-४०/एजी-६०७९)ची दुचाकी असा एकूण ६०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिठाेरी ते नरखेड मार्गावर आराेपी राॅबिन पिलाजी नारनवरे व विलास धकीते (दाेन्ही रा. नरखेड) हे एमएच-४०/बीएच-१०२२ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावठी दारूची अवैध वाहतूक करताना आढळून येताच, पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ४५ लिटर गावठी दारू व दुचाकी असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, पाेलिसांनी खापरी (सावरगाव) शिवारात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर धाड टाकली. यात आराेपी भीमराव जानराव साेमकुवर, रामा भाऊराव लंगडे (दाेन्ही रा. राजनी), नंदू शेषराव घाटाेड (रा. सावरगाव), संदीप रामपंत पांडे, सुनील केशव ठवरे दाेन्ही (रा. सिंदी), सुरेंद्र महादेव ढाेके (रा. पेठ बुधवार), काटाेल व संदीप गाेपाळ कुंभरे (रा. मन्नाथ खेडी) या सात जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत एमएच-३१/ईक्यू-२५८० क्रमांकाचे चारचाकी वाहन, तीन माेबाईल हॅण्डसेट व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ५ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच अवैधरीत्या सट्टापट्टी लिहिणाऱ्या एका आराेपीविरुद्ध कलम १२ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली.

याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, ब्रह्मदेव देशमुख, पाेलीस उपनिरीक्षक अरुण खुटेमाटे करत आहेत. तालुक्यात अवैध धंदे चालविणाऱ्यांवर पाेलिसांची करडी नजर असून, नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत पाेलीस ठाण्यात माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी केले आहे.