शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपुरातील कुख्यात ठगबाज प्रवीण निनावेची ५६ लाखाची संपत्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:18 IST

स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली.

ठळक मुद्देप्रवर्तन निदेशालयाची कारवाई : व्यापारांना लावला करोडोंचा चुना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली. निनावे याच्याविरुद्ध इतर राज्यांतही अनेक प्रकरण दाखल आहेत. तो नॅशनल कमोडिटी सप्लाय कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एनसीएसईआय) नावाने कंपनी चालवत होता. कंपनी केंद्र सरकारद्वारे प्रमाणित असल्याचे सांगत होता. बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत साखर उपलब्ध करून देतो, असे व्यापाऱ्यांना सांगायचा. सुरुवातीला कमी किमतीत साखर उपलब्ध करून देत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचा निनावेवर विश्वास बसायचा. त्यानंतर मोठा आॅर्डर घेऊन बहुतांश राशी अग्रीम घ्यायचा. परंतु पुरवठा करायचा नाही. या युक्तीने त्याने अनेक व्यापाऱ्यांना ठगविले. त्याने व्यापाऱ्यांना करोडो रुपयांनी ठगविले.निनावेची ठगबाजी समोर आल्यानंतर ‘ईडी’ ने प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) २००० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. निनावे बराच काळ राजस्थान पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान प्रवर्तन निदेशालयाला निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची चल-अचल संपत्तीची माहिती मिळाली. ही संपत्ती त्याने ठगबाजी करून जमविली होती. ‘ईडी’ ने ही संपत्ती जप्त केली. यात एचडीएफसी बँकेच्या धंतोली शाखेच्या खात्यात २,१५,०१६ रुपये, मुंबई शाखेच्या खात्यातून २८,९३,३६२ रुपये, १६,७२,७३६ रुपये किमतीचे महिंद्रा वाहन तसेच ८४,०९७८ रुपये किमतीचे बोलेरो वाहनाचा समावेश आहे.निनावे याच्या ठगबाजीचा कारभार वाढण्यासाठी शहर पोलिसांचे मोठे योगदान राहिले आहे. निनावे हा धंतोलीतील कार्यालयातून कामकाज चालवीत होता. त्याने बरीच वर्षे धंतोली पोलिसांना मॅनेज करून ठगबाजीचा कारभार केला. त्याच्यामुळे धंतोली पोलीस मालामाल झाले होते. निनावे याच्याविरुद्ध अनेक राज्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्या राज्यातील पोलीस त्याला पकडण्यासाठी धंतोली ठाण्यात पोहचल्यानंतर निनावेला तत्काळ माहिती मिळत होती. त्यामुळे तो फरार होत होता. बऱ्याचदा बाहेरच्या राज्याचे पोलीस धंतोली ठाण्यात न पोहचता निनावे याच्या कार्यालयात पोहचत होते. निनावे याने कार्यालयात लपण्याची जागा बनविली होती. धंतोली पोलीस अथवा आर्थिक गुन्हे शाखेने कधीही निनावेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. लोकमतने केला होता खुलासालोकमतने सहा महिन्यांपूर्वी निनावे याने नव्याने व्यवसाय सुरू केल्याचा खुलासा केला होता. त्याने वर्धा रोडवर कार्यालयही घेतले होते. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. लोकमतच्या खुलाशानंतर ‘ईडी’च्या कारवाईत वेग आला. आता आरोपपत्राची तयारीसूत्रांच्या मते ‘ईडी’ आता निनावे याच्या विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याच्या तयारीत आहे. ‘ईडी’ निनावेच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करीत आहे. सध्या आर्थिक फसवणुकीची प्रकरण वाढले आहे. त्यामुळे ‘ईडी’ने निनावेच्या प्रकरणाला अतिशय गांभिर्याने घेतले आहे.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूर