मुलाकडे दुबईला गेलेल्या महिलेच्या घरातून १.५४ लाखांचा मुद्देमाल लंपास
By दयानंद पाईकराव | Updated: July 1, 2024 15:56 IST2024-07-01T15:48:46+5:302024-07-01T15:56:00+5:30
Nagpur : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Property worth 1.54 lakhs stolen from a woman who went to Dubai with her son
नागपूर : मुलाकडे दुबईला गेलेल्या महिलेचे दागीने व रोख ६१ हजार असा एकुण १ लाख ५४ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ते ३० जून २०२४ दरम्यान घडली. सुखबीर कौर गुरमितसिंग विरदी (५९, रा. बुद्धानगर, जसवंत मॉलमागे, पाचपावली) या आपल्या घराला कुलुप लाऊन दुबईला राहत असलेल्या मुलाकडे गेल्या होत्या.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने व रोख ६१ हजार असा एकुण १ लाख ५४ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सुखबीर कौर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.