शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर ७0 टक्के वाढणार

By admin | Updated: May 13, 2014 00:52 IST

गेल्या काही वर्षांपासून सखोल चर्चा, विचार मंथन व अभ्यास केल्यानंतर शेवटी स्थायी समितीने मालमत्ता कराच्या नव्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली आहे.

तीन नव्या करांचा बोझा : दर फेब्रुवारीत आढावा

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून सखोल चर्चा, विचार मंथन व अभ्यास केल्यानंतर शेवटी स्थायी समितीने मालमत्ता कराच्या नव्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली आहे. रेडी रेकनरला आधार मानत वार्षिक भाडे मूल्य (एआरव्ही) निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी सहा श्रेणीत शहराची विभागणी करण्यात आली आहे. सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार आता मालमत्ता करात ३0 ते ७0 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. दरवर्षी फेब्रुवारीच्या २0 तारखेला मालमत्ता कराचा आढावा घेतला जाईल. एवढेच नव्हे तर मलजल लाभ कर, पाणी लाभ कर व रस्ता कर अशा तीन नव्या करांचा बोझादेखील नागपूरकरांवर टाकण्यात आला आहे.

बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने सोमवारी मालमत्ता कराच्या नव्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली. आता संबंधित प्रस्ताव चर्चेसाठी महापालिका सभागृहात सादर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. कर संकलन व वसुली समितीने १ एप्रिल २0१४ पासून नव्या फॉर्म्युल्यानुसार कर वसुली करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नव्या वर्षात मालमत्ता करात वाढ होण्याची जास्त शक्यता आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी नागरिकांचे हित विचारात घेता करामध्ये कमीतकमी वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. नव्या फॉर्म्युल्यानुसार कर वसुली केल्यामुळे ५0 कोटींनी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. ही नवी व्यवस्था सुरू असलेल्या आर्थिक वर्षात लागू करायची की नव्या आर्थिक वर्षात, याबाबतचा निर्णय महापालिका सभागृह घेईल. स्थायी समितीने याला मंजुरी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

असा लागणार कर

कर संकलन व वसुली समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी एक उदाहरण देताना या नव्या फॉर्म्युल्यामधील बारकावे सांगितले. ते म्हणाले, समजा रामदासपेठ येथे दोन हजार चौरस फुटाच्या भूखंडावर घर आहे तर त्याला प्रथम चौरस मीटरमध्ये परिवर्तित केले जाईल. संबंधित घर १८६ चौरस मीटर झाल्यामुळे फॉर्म्युल्याच्या आधारावर वार्षिक मालमत्ता कर १६२१ रुपये येईल. जर संपूर्ण घरात भाडेकरू राहत असतील तर कर वाढून २३ हजार ४४३ रुपये होईल. कॅप सिस्टम लागू करण्यात आलेला नाही.

स्वत:च करता येणार आकलन

मालमत्ता कर प्रणाली लोकाभिमुख करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिका एक सॉफ्टवेअर तयार करीत आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या आपला मालमत्ता कर काढता येईल. याशिवाय महापालिका एक पुस्तिका काढणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक हजार घरांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यात जुन्या रेंट चार्ट, कॅपिटल बेस व नव्या पद्धतीला आधार मानले जाईल. २७ मे पासून याची सुरुवात होईल, असेही बोरकर यांनी सांगितले.