उल्हासनगरच्या प्रॉपर्टी डीलरचा नागपुरात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 20:12 IST2023-02-25T20:11:54+5:302023-02-25T20:12:22+5:30
Nagpur News गणेश पेठमधील घाट रोड येथील गुजरात हॉटेलमध्ये थांबलेल्या प्रॉपर्टी डीलरचा प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाकर देवीदास कुरेकर (६४, उल्हासनगर, ठाणे) असे मृतक प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे.

उल्हासनगरच्या प्रॉपर्टी डीलरचा नागपुरात मृत्यू
नागपूर : गणेश पेठमधील घाट रोड येथील गुजरात हॉटेलमध्ये थांबलेल्या प्रॉपर्टी डीलरचा प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाकर देवीदास कुरेकर (६४, उल्हासनगर, ठाणे) असे मृतक प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे.
कुरेकर आणि त्यांचा मित्र गुलाब विठ्ठल फडके (६५, खिंडीपाडा, मुलुंड कॉलनी, मुंबई) हे नागपूरला आले होते. ते गुजरात हॉटेलमध्ये थांबले होते. प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय असल्यामुळे ते दोन दिवस कुही मांढळ व भंडारा येथे जाऊन आले. गुरुवारी (दि. २३) रात्री प्रभाकर यांना प्रकृती बरी वाटत नसल्याचे फडके यांना सांगितले होते. शुक्रवारी (दि. २४) दोघेही हॉटेलमधून रुग्णालयात जात असताना हॉटेलच्या गेटजवळ अचानक त्यांची प्रकृती बिघडली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना धंतोलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गुलाब विठ्ठल फडके यांनी दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.