शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

नागपूर मनपाच्या कर विभागात ‘परफॉर्मन्स’वर बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:11 IST

महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात येईल. निष्क्रिय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्देकुकरेजा यांचा कामचुकारांना इशारा : हनुमाननगर, नेहरूनगर व गांधीबाग झोनच्या वसुलीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात येईल. निष्क्रिय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.मालमत्ता कर वसुलीचा आढवा घेण्यासाठी हनुमाननगर, नेहरूनगर आणि गांधीबाग झोन कार्यालयात बैठकी घेण्यात आल्या . मार्च महिना संपायला १० दिवस शिल्लक असतानाही ज्या कर्मचाऱ्यांनी उद्दिष्ट ५० टक्के ही गाठले नाही अशा कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली.. २५ मार्चपर्यंत त्यांच्या कार्यात काय प्रगती आहे, याचा अहवाल त्यांनी सहायक आयुक्तांमार्फत मागविला. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही कुकरेजा यांनी दिली. अडचणींवर मात करून, मार्ग काढून करवसुलीचे उद्दिष्ट गाठा, असे निर्देश त्यांनी दिले.हनुमाननगर झोनच्या बैठकीत सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी कर वसुलीसंदर्भात आणि त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. हनुमाननगर झोनअंतर्गत ७४३३८ मालमत्ता असून ६२६५२ निवासी आहेत. ६४१७ व्यावसायिक असून ५२६९ खुले भूखंड आहेत. २० कोटी २४ लाख रुपये जुनी वसुली येणे बाकी असून नवीन डिमांड १७ कोटी १५ लाखांची आहे. करापोटी एकूण ३७ कोटी ३९ लाख रुपये येणे असल्याचे त्यांनी सांगितले.नेहरूनगर झोनअंतर्गत एकूण २२ कोटी ७६ लाख रुपये वसूल करावयाचे आहेत. त्यापैकी १० कोटी ८६ लाख जुनी वसुली असून ११ कोटी १० लाख रुपये चालू वषार्ची डिमांड असल्याची माहिती सहायक आयुक्त राजेश कराडे यांनी दिली. हनुमाननगर झोनच्या बैठकीला सभापती भगवान मेंढे, स्थायी समितीचे सदस्य नागेश मानकर, नगरसेविका मंगला खेकरे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, कर निर्धारक तथा संग्राहक दिनकर उमरेडकर, प्रफुल्ल फरकासे, नेहरूनगर झोनच्या बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे तर गांधीबाग झोनच्या बैठकीत सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.विवादित मालमत्तांचा प्रश्न निकाली काढाप्रत्येक झोनअंतर्गत काही विवादित मालमत्ता आहेत. त्यांच्यावरील कराची रक्कम दर वर्षीच्या थकीत रकमेमध्ये दिसून येते. यामुळे उद्दिष्ट वाढलेले असते. एप्रिल महिन्यापासून या सर्व मालमत्तांची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. यासोबतच काही शासकीय मालमत्ता, काही निमशासकीय मालमत्ता ज्यांच्या करवसुलीसंदर्भात काही अडथळे आहेत, अशी प्रकरणेही निकाली काढण्यात येतील. अशा मालमत्तांचा प्रस्ताव झोन कार्यालयांनी स्थायी समितीकडे पाठवावा, असे निर्देशही वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर