राज्यातील ९७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:02 AM2019-07-30T00:02:16+5:302019-07-30T00:07:44+5:30

गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ९७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी आज गृह विभागाने जाहीर केली. त्यात नागपुरातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेले सात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी/उपअधीक्षक म्हणून नागपुरात बदलून येणार आहेत.

Promotion of 97 senior police inspectors in the state | राज्यातील ९७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

राज्यातील ९७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

Next
ठळक मुद्देनागपुरातील एकालाच लाभ : बोंडे भंडारा एसीबीचे उपअधीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ९७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी आज गृह विभागाने जाहीर केली. त्यात नागपुरातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेले सात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी/उपअधीक्षक म्हणून नागपुरात बदलून येणार आहेत.
सुनील बोंडे असे येथील पदोन्नती मिळालेल्या वरिष्ठ निरीक्षकांचे नाव आहे. सध्या ते एसीबीच्या नागपूर मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती देऊन सरकारने भंडारा मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्याचप्रमाणे पदोन्नती झालेल्यांपैकी सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपैकी ठाणे शहरातील किशोरकुमार दत्ताजीराव जाधव, रत्नागिरीतील अयूब खान मुबारक खान आणि जळगावमधील विलास आत्माराम सोनवणे हे तीन अधिकारी नागपूर शहरात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर येणार आहेत. बृहन्मुंबईतील सुरेखा बाबूराव कपिले नागपुरात टीआरटीआयला उपअधीक्षक, बृहन्मुंबईतीलच कल्पना यशवंत गाडेकर नक्षलविरोधी अभियानात उपअधीक्षक, ठाण्याचे नागेश विश्वनाथ जाधव जातपडताळणी विभागात उपअधीक्षक आणि एसीबीचे सुहास मधुकर नाडगौडा राज्य महामार्ग पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.

Web Title: Promotion of 97 senior police inspectors in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.