शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कॉईन बॉक्स दहशतवादी कैद्यांसाठी नाही

By admin | Updated: January 4, 2016 04:56 IST

कारागृहातील कॉईन बॉक्स फोन दहशतवादी व अन्य विशिष्ट कैद्यांना वापरू न देण्याचे परिपत्रक मुंबई उच्च

नागपूर : कारागृहातील कॉईन बॉक्स फोन दहशतवादी व अन्य विशिष्ट कैद्यांना वापरू न देण्याचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरविले आहे. तसेच, या परिपत्रकाविरुद्ध मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील कैदी अशारत शफिक अहमद अंसारीने दाखल केलेली फौजदारी रिट याचिका फेटाळून लावली आहे. अंसारीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता यावे यासाठी राज्यातील नागपूरसह अन्य काही मध्यवर्ती कारागृहांमध्ये कॉईन बॉक्स फोन बसविण्यात आले आहेत. हा फोन कोणाला वापरू द्यायचा व कोणाला नाही यासंदर्भात कारागृह पोलीस महासंचालकांनी २३ एप्रिल २०१५ रोजी परिपत्रक काढले आहेत.त्यात कैद्यांची विविध वर्गवारी करण्यात आली आहे. परिपत्रकातील दहाव्या खंडात दहशतवादी, बॉम्बस्फोट व देशाविरुद्ध गुन्हे करणारे दोषी कैदी, नक्षली कैदी, युद्धातील कैदी, कुख्यात कैदी आणि अन्य विविध बाबींमुळे अपात्र कैद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कैद्यांना कॉईन बॉक्स फोनची सुविधा देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अंसारी या गटात मोडतो. यामुळे त्याला ही सुविधा नाकारण्यात आली आहे.अंसारीने आजारी आईशी बोलण्यासाठी कॉईन बॉक्स फोन वापरू देण्याची परवानगी मागितली होती. परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या परिपत्रकामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद २१, १४ व १९ मधील तरतुदींचे उल्लंघन होतेय असे त्याचे म्हणणे होते. ६ आॅगस्ट २००९ रोजी सत्र न्यायालयाने झवेरी बाजार येथील बॉम्बस्फोट प्रकरणात अंसारीला विविध गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.(प्रतिनिधी)काय म्हणाले न्यायालय४राज्यघटनेतील अनुच्छेद २१ मधील प्रक्रियेचे पालन करून अंसारीचा जगण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. देश, कारागृह व कारागृहातील अन्य कैदी यांची सुरक्षा लक्षात घेऊन संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अंसारीला स्वत:ची तुलना इतर कैद्यांसोबत करता येणार नाही. कॉईन बॉक्स फोन प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. सर्वच कैद्यांना कॉईन बॉक्सचा उपयोग करू दिल्यास, यामुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कॉईन बॉक्स वापरू दिला नाही, याचा अर्थ अंसारी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकत नाही, असा होत नाही. कायद्यात उपलब्ध मार्गाचा त्याला अवलंब करता येईल.