पिपळा डाक बंगल्याजवळ छापा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:50+5:302021-03-07T04:09:50+5:30
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावनेर मार्गावरील पिपळा डाक बंगल्याजवळच्या एका अड्ड्यावर छापा ...

पिपळा डाक बंगल्याजवळ छापा ()
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साईज) विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावनेर मार्गावरील पिपळा डाक बंगल्याजवळच्या एका अड्ड्यावर छापा मारून मोठा दारूसाठा जप्त केला.
या अड्ड्यावर अनेक दिवसांपासून दारूची धडाक्यात साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला कळली. त्यावरून विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईजच्या भरारी पथकाने शुक्रवारी सायंकाळी या अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी येथे आरोपी युवराज ठाकरे आणि विनोद ठाकरे यांच्याकडे देशी विदेशी मद्याचा साठा आढळला. पोलिसांनी तेथून विदेशी दारूच्या ४२ तर देशी दारूच्या ८७ बाटल्या जप्त केल्या. या दारूची वाहतूक करण्यासाठी आरोपी ठाकरे बंधू एका दुचाकीचा वापर करीत होते. ती दुचाकीसुद्धा पोलिसांनी जप्त केली. दारूबंदी कायद्यानुसार ठाकरे बंधूंना अटक करण्यात आली.