शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शाळेत सीसीटीव्ही, सुरक्षेचे उपाय करण्यात मुख्याध्यापक असमर्थ

By निशांत वानखेडे | Updated: August 25, 2024 18:49 IST

तुटपुंजे वेतनेतर अनुदान, तेही संस्थाचालकांच्या घशात : शिक्षक संघटनांचा आराेप

नागपूर : बदलापूरच्या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत शाळांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागे वेगवेगळी कारणे समाेर येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय शाळांमध्ये अतिरिक्त उपाययाेजना करण्यासाठी मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाचाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. सरकारकडून अतिशय तुटपुंजे वेतनेतर अनुदान मिळते. तेही संस्थाचालकांद्वारे वापरले जाते. त्यामुळे शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षेचे उपाय कसे करावे, ही समस्या मुख्याध्यापकांसमाेर असते.

शिक्षक संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळेसाठीच्या अतिरिक्त खर्चासाठी राज्य सरकारकडून वेतनेतर अनुदान दिले जाते. २०११ पासून हे अनुदान लागू करण्यात आले आहे. मात्र नियमानुसार २००९ मधील एप्रिल महिन्यातील शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारावर पाचव्या वेतन आयाेगाच्या ४ टक्के वेतनेतर अनुदान शाळांना दिले जाते. सध्या ७ वा वेतन आयाेग लागू असताना ५ व्या वेतन आयाेगानुसार अनुदान देणे अनाकलनीय आहे. हे अनुदान अतिशय तुटपुंजे असल्याच्या तक्रारी शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून झाल्या आहेत, पण त्यात काेणताही बदल झाला नाही. हे तुटपुंजे अनुदान शाळांचे वीज बिल, स्टेशनरी आणि इंटरनेटचे बिल भरण्यात खर्च हाेते. त्यामुळे इतर खर्च करावा कसा, हा प्रश्न आहे.दुसरी बाब म्हणजे मिळणारे अनुदान मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाच्या संयुक्त खात्यावर जमा हाेते. तेही संस्थाचालकांकडून लाटले जाते व मुख्याध्यापकांना दबावापाेटी निमुटपणे त्यावर सही करावी लागते. अशा स्थितीत शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा भिंत बांधणे, असे कार्य कुठून करावे, ही समस्या मुख्याध्यापकांपुढे आहे.

अनेक खाजगी अनुदानित शाळांमध्ये मुख्याध्यापकांना वेतनेत्तर अनुदान वापरण्याचे पाहिजे तेवढे स्वातंत्र्य नाही त्यामुळे शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करताना मुख्याध्यापकाना अडचणी येत आहे. तुटपुंज्या अनुदानात इलेक्ट्रिक बिल भरणे सुद्धा कठीण जात असल्याने बाकी सुविधा कशा निर्माण करायच्या?

- अनिल गोतमारे, जिल्हाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर

शाळेच्या भौतिक सुविधांसाठी मिळणारे वेतन अनुदान अजूनही पाचव्या वेतन आयोगाच्या दरानेच मिळत आहे जे फारच तुटपुंजे आहे. त्यातही वेतनेत्तर अनुदान दरवर्षी मिळत नाही आणि जे वेतनेत्तर अनुदान मिळते त्याच्यावरही काही संस्थाचालकच डल्ला मारतात. आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता शिक्षकांकडूनच वसुली सुरू झालेली आहे. शिक्षण विभागाने सीसीटीव्ही बसविण्याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांना तात्काळ वेतन अनुदानाची काही रक्कम जमा करावी व शिपायाचे पद वेतनश्रेणीवर भरण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा.- अनिल शिवणकर, अध्यक्ष ,पूर्व विदर्भ, भाजप शिक्षक आघाडी

शिक्षकांची पदे भरण्यापासून ते धान्य वितरणापर्यंत शिक्षण क्षेत्रात माेठा भ्रष्टाचार आहे. अशात वेतनेतर अनुदान संस्थाचालकांच्या घशात जाते. ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकांवर संस्थाचालकांचा दबाव असताे. अशावेळी कुठून सीसीटीव्ही लावणार व कुठून सुरक्षा भिंत बांधणार? आता सरकारच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही बसविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अवैध वसुली सुरू झाली आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नाही.

- प्रमाेद रेवतकर, अध्यक्ष, खासगी शाळा शिक्षक संघ.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळाcctvसीसीटीव्ही