शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:06 AM

देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे.

ठळक मुद्दे२६ लाख लोकसंख्येत केवळ सात लाख लोकांनी खाल्ल्या गोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. रोग झाल्यावर कुठलेच औषध नाही. म्हणूनच राष्ट्रीयस्तरावर हत्तीरोग दुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली. देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे. औषधे घेऊन येणाऱ्यांनाच अपार्टमेंटच्या दारावर अडविले जात आहे. गोळ्या वाटप करणाºया कर्मचाºयांना सुशिक्षितांच्या वस्तीमध्ये कटु अनुभव येत आहेत. परिणामी, २६ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात नऊ दिवसांत केवळ सात लाख लोकांपर्यंतच कर्मचारी पोहचू शकले आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम ३१ तारखेला संपत आहे.देशात हत्तीरोगाने ग्रस्त असलेले २५६ जिल्हे आहेत. यातील महाराष्ट्रात ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकट्या विदर्भात आठ जिल्हे आहेत. २०१७ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात हत्तीरोगाचे ६५ हजार रुग्ण आहेत. यात नागपूर जिल्ह्यात ४,७५८ व्यक्तींना अवयव सुजण्याचा तर २,८७७ व्यक्तींना गुप्तांगांना सुजण्याचा त्रास आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वी ‘डायथिल कार्बामॅझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु हत्तीपाय दुरीकरण मोहिमेत ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधाचाही समावेश करण्यात आला आहे. या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यासह बिहारमधील अरवल जिल्हा, उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा, झारखंड येथील सिमडेगा जिल्हा व कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यामध्ये करण्यात आला. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ५१ लाख आहे. यातील ४८ लाख लोकांना ३१ जानेवारीपर्यंत हत्तीरोगाचे ‘ट्रिपल ड्रग’ देण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. यासाठी १३ हजार ९०० कर्मचाºयांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना आपल्यासमोर औषधे खाऊ घालण्याची ही एकच अट त्यांना देण्यात आली आहे. परंतु या मोहिमेची व्यापक जनजागृती झाली नसल्याने व या रोगाच्या गंभीरतेविषयी लोकांना माहिती नसल्याने अनेक अडचणींना येत असल्याचे वास्तव आहे.

पाठ फिरताच फेकल्या जात आहेत गोळ्याकर्मचारी घराघरात जाऊन हत्तीरोगाची माहिती देत आहेत. रोगाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक गोळ्या आपल्या समक्ष खाण्याची विनंती करीत आहे. परंतु अनेक जण जेवण व्हायचे आहे असे सांगून कर्मचाऱ्यांकडून गोळ्या घेतात आणि त्यांची पाठ फिरताच फेकून देतात, हा अनुभव एका कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर ‘लोकमत’ ला सांगितला.

कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नाहीशहरातील नागरिकांना गोळ्या खाऊ घालण्याची जबाबदारी मनपाचा आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, नर्सिंग स्टाफ व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. यांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. परंतु यांच्याकडे ओळखपत्र नाही. यामुळे अनेक नागरिक त्यांच्यावर संशय व्यक्त करीत असल्यानेही मोहिमेत आडकाठी येत आहेत.

काय आहे, प्रतिबंधक उपचारहत्तीरोगाच्या दुरीकरणावर ‘डायथिल कार्बामॅझिन सायट्रेट’, ‘अलबेंडाझॉल’ व ‘आयव्हरमेक्टिन’च्या गोळ्या म्हणजेच ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ प्रभावी प्रतिबंधक उपचार पद्धती आहे. यामुळे ‘मायक्रोफायलेरिया’ लवकर नष्ट होण्यास मदत होते. हे औषध उंचीनुसार, जेवणानंतर दिले जाते. दोन वर्षांपेक्षा लहान मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांनी औषधी घेऊ नये.

औषधाचा ‘साईड इफेक्ट’ नाहीहत्तीरोगावर औषधोपचार नाही. प्रतिबंध हाच एकमेव उपचार आहे. म्हणूनच हत्तीरोग दुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात उंचीनुसार दिल्या जाणाऱ्या ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ औषधांचा कुठलाही दुष्परिणाम म्हणजेच ‘साईड इफेक्ट’ नाही. मोहिमेच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. ३१ जानेवारीनंतरही मोहीम सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे.-जयश्री थोटे, अधिकारी, हत्तीरोग व हिवताप विभाग, मनपा

आरोग्यसेविकांना अपमानास्पद वागणूकदक्षिण नागपुरात मलेरिया फायलेरिया विभागाचे निरीक्षक दिलीप रामटेके यांच्या नेतृत्वात सहदेव देशपांडे निरीक्षक, ज्योती मेहत्रे व मनीषा भोयर आरोग्यसेविका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवित आहे. न्यू बालाजीनगर परिसरात त्यांनी हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या घरोघरी जाऊन दिल्या. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. २० डिसेंबरपासून हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ज्योती मेहत्रे व मनीषा भोयर या आरोग्य सेविका घरोघरी जाऊन औषधी देत आहे. पण २० ते २५ टक्के लोकांकडूनच त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. ज्योती यांनी सांगितले की, सुशिक्षित वस्त्यांमध्ये तर लोक घरात घ्यायला सुद्धा तयार नाही. काही लोकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे.असा होतो हत्तीरोगक्युलेक्स डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात.तिथे त्याचे रूपांतर मोठ्या कृमीमध्ये होते.एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी माणसाच्या शरीरात पाच ते आठ वर्षे राहू शकतो.प्रौढ कृमी लसिका ग्रंथी व लसिका वाहिन्यात राहतो. यामुळे त्या भागाला हाताला आणि विशेष करून पायाला सूज येऊ लागते.हा पाय सुजत जातो. तो हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो.हत्ती पाय पुन्हा पूर्ववत करावयाचे औषध नाही.काही पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सूज येऊन कमालीचे मोठे होते. इंग्रजीत याला हायड्रोसिल म्हणतात.

टॅग्स :Healthआरोग्य