शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळांच्या मुदतवाढीसाठी राष्ट्रपतींचाच आदेश हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आग्रही भूमिका घेतली असतानाच राष्ट्रपतींकडूनच या मंडळांच्या मुदतवाढीचा आदेश निघाला नसल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात काही नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

या मंडळांना पाच वर्षांसाठी शेवटची मुदतवाढ ३० एप्रिल २०१५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विशेष आदेशाद्वारे दिली होती. ती मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपल्यानंतर नवी मुदतवाढ मिळाली नाही आणि मूळ घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२० ला अनुशेष निर्मूलनाबाबत शेवटचे निर्देश जारी केले. एप्रिल महिन्याच्या अखेरीस जेव्हा मंडळांची मुदत संपली तेव्हा राज्य व संपूर्ण देश कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा सामना करीत होता. त्यामुळे मुदतवाढीचा प्रश्न फारसा चर्चेत आला नाही.

अनुशेष अजूनही शिल्लकच

दरम्यान, मार्च २०११ मध्ये विदर्भ व मराठवाडा या दोन्ही मागास प्रदेशांमधील आर्थिक अनुशेष संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात सिंचन क्षेत्राचा अनुशेष मुख्य भाग होता. आर्थिक अनुशेष संपला असला तरी भौतिक अनुशेष मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहिला. याचा अर्थ, पैसा खर्च झाला तरी सिंचनक्षमता तयार झाली नाही, हा मुद्दा सोयीस्करपणे दुर्लक्षित करण्यात आला. शेवटच्या आकडेवारीनुसार, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यांमध्ये जून २०१९ अखेरीस १ लाख ६३ हजार १३९ हेक्टरचा सिंचन अनुशेष कायम आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात अशाच पद्धतीने जून २०१९ मध्ये ८०४५ हेक्टरचा अनुशेष आहे.

अनुशेषाचे नव्याने मोजमाप आवश्यक

महत्त्वाचे म्हणजे, १९९४ मध्ये स्व. भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निर्देशांक व अनुशेष समितीने केलेल्या अभ्यासानंतर प्रत्यक्ष जिल्हानिहाय अनुशेषाची मोजणी झालेली नाही. अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या समितीने अनुशेषाचे प्रदेशनिहाय स्तर ठरविले. तथापि, त्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला नाही. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व आधीच्या शिल्लक अनुशेष काढून टाकण्यासाठी प्रादेशिक विकास मंडळांचे अस्तित्व कायम ठेवण्याची गरज आहेच, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

-------------------------------

कोट...

विकास मंडळांना मुदतवाढीचा मुद्दा आता राज्यपाल किंवा राज्य सरकारच्या हातात राहिलेला नाही. या मंडळांच्या स्थापनेची तरतूद भारतीय राज्यघटनेत असल्याने राष्ट्रपतींकडूनच त्यांची मुदत वाढविली जाऊ शकते. आता ही मंडळे बंद होऊन एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेल्याने त्यांचे गठन राष्ट्रपतींच्या नव्या अध्यादेशानेच होऊ शकते.

- ॲड. फिरदोस मिर्झा, विधिज्ञ, नागपूर

------------------------------