नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:12 IST2019-08-14T23:11:41+5:302019-08-14T23:12:56+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Presidential Police Medal to three ASIs in Nagpur City | नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

नागपूर शहरातील तीन एएसआयला राष्ट्रपती पोलीस पदक

ठळक मुद्देतिडके, ठाकरे आणि शिवलकर होणार सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे एएसआय अशोक सोमाजी तिडके, परिमंडळ ३ चे एएसआय विश्वास शामराव ठाकरे आणि वाहतूक शाखेचे एएसआय नितीन भास्करराव शिवलकर यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी तिघांचेही अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. यात नागपूरच्या तीन अधिकाऱ्यांसह महराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तिघांनाही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल.
तिडके यांनी १३१ गुन्हेगारांना केले तडीपार
गुनहे शाखेचे एएसआय अशोक तिडके यांनी १३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी ३६ गुन्हेगारांना एमपीडीएअंतर्गत तुरुंगात पाठविण्यातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. १९८७ मध्ये पोलीस सेवेत सामील झालेले तिडके यांना डीजी अवॉर्डसह आतापर्यंत ५२८ रिवॉर्ड मिळालेले आहेत. धंतोलीतील चर्चीत हत्याकांडात आरोपीपर्यंत पाोहोचण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. माहितीचा अधिकार आणि वादग्रस्त दस्तावेजांची चौकशी यात त्यांना विशेष अनुभव आहे.
ठाकरे यांनी आजवर ९३ गुन्हेगारांच्या मुसक्या बांधल्या
झोन ३ मध्ये कार्यरत एएसआय विश्वास ठाकरे यांनी आतापर्यंत ९३ गुन्हेगारांना तडीपार करून त्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. ठाकरे हे १९८८ मध्ये नागपूर ग्रामीण पोलीसमध्ये दाखल झाले. १९९२ मध्ये त्यांची शहर पोलिसात बदली झाली. त्यांनी आतापर्यंत २८२ रिवॉर्ड प्राप्त केले आहेत. २०१२ मध्ये डीजी इंसिग्नियानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिवलकर यांची बंदोबस्तात महत्त्वपूर्ण कामगिरी
वाहतूक शाखेचे एएसआय नितीन शिवलकर यांना वाहतुकीच्या योग्य बंदोबस्तासाठी ओळखले जाते. ते डीजी अवॉर्डने सन्मानितसुद्धा झालेले आहेत. ते सण-उत्सव किंवा अतिविशिष्ट व्यक्तींच्या दौऱ्यात बंदोबस्त अतिशय चोखपणे सांभाळतात. १९८७ मध्ये पोलीस सेवेत सामील झालेले शिवलकर यांनी गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली आणि गुन्हे शाखेत उत्तम काम केले आहे. त्यांना अतापर्यंत वरिष्ठांकडून २२२ वेळा रिवॉर्ड मिळालेला आहे.

Web Title: Presidential Police Medal to three ASIs in Nagpur City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.