शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र सभापतींचा अहवाल सादर

By admin | Updated: November 11, 2015 02:33 IST

सीताबर्डी येथे ८ एकर जागेवर भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे. कॉम्प्लेक्ससाठी जागा मागण्यात...

हायकोर्ट : सीताबर्डीतील कमर्शियल कॉम्प्लेक्सचे प्रकरणनागपूर : सीताबर्डी येथे ८ एकर जागेवर भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे. कॉम्प्लेक्ससाठी जागा मागण्यात आल्यामुळे अभ्यंकर रोडवरील १८ दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने प्रकरणावर दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर दुकानदारांना नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींसमक्ष तक्रार मांडण्याची व तडजोडीने प्रश्न मिटविण्याची सूचना केली होती. त्यानुसार नासुप्र सभापतींनी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. न्यायालयाने या अहवालाची प्रत सर्व पक्षकारांना देण्यास सांगितले असून, प्रकरणावर १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.संबंधित दुकानदारांना २४ एप्रिल २०१५ रोजी नागपूर सुधार प्रन्यास कायद्याच्या कलम ११५ अंतर्गत नोटीस बजावून कमर्शियल कॉम्प्लेक्सकरिता ८ मीटर जागा खाली करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जागा खाली न केल्यास स्वत: कारवाई करू, असे नासुप्रतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या नोटीसविरुद्ध दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तडजोड होईपर्यंत संरक्षण देण्यात यावे, वादग्रस्त नोटीस रद्द करण्यात यावी, कॉम्प्लेक्सचा आराखडा चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे, जमीन मालकाचे आक्षेप विचारात घेण्यात आलेले नाहीत, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. २००२ मध्ये बुटी परिवाराच्या जागेवरील भाडेकरूंसोबत झालेल्या तडजोडीनंतर कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या योजनेवर अंमलबजावणी सुरू झाली होती. शासनाने योजनेला मान्यता दिल्यानंतर जमीन संपादित करण्यात आली. गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅन्ड रिअल इस्टेट कंपनीला कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)