विदर्भात पावसाची हजेरी; मान्सूनपूर्व पावसाने उडाली त्रेधातिरपिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 07:20 AM2021-06-09T07:20:00+5:302021-06-09T07:20:02+5:30

Nagpur News नागपूर शहरासह विदर्भातील गाेंदिया, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपिट उडाली. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

Presence of rains in Vidarbha; Pre-monsoon rains hits | विदर्भात पावसाची हजेरी; मान्सूनपूर्व पावसाने उडाली त्रेधातिरपिट

विदर्भात पावसाची हजेरी; मान्सूनपूर्व पावसाने उडाली त्रेधातिरपिट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूर शहरासह विदर्भातील गाेंदिया, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपिट उडाली. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

नागपूर शहरात मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारी शहरात बहुतेक सर्व भागांत पाऊण तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले, तर दक्षिण-पश्चिम नागपूरसह विविध भागांत रस्त्यांवर झाडे पडली. यामुळे वीज पुरवठादेखील खंडित होता. अद्याप मान्सूनचे आगमन व्हायचे असताना मनपाच्या पावसाळ्याच्या तयारीचे या पावसामुळे पूर्णपणे वाभाडे निघाले.

सकाळपासून आभाळात ढग दाटून आले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक पावसाला सुुरुवात झाली. सोबतच वारेदेखील वाहत होते. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही घरांमधील शेडची पत्रेदेखील उडून गेले, तर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शहरातील अनेक भागांत झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडल्या. प्रामुख्याने माटे चौक, आयटी पार्क परिसर, बजाजनगर, दीक्षाभूमी मार्ग, स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर यांचा समावेश होता. झाडे पडल्यामुळे वीज पुरवठादेखील विस्कळीत झाला होता.

यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात बुधवारपासून खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहरात मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान पत्रकार काॅलनी परिसरात झाड उन्मळून पडले. तर एका हाॅटेलवरील टिनपत्रेही उडून गेले.

Web Title: Presence of rains in Vidarbha; Pre-monsoon rains hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस