नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 22:33 IST2021-06-22T22:32:42+5:302021-06-22T22:33:18+5:30
Prajakta Lavangare-Verma नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांच विभागीय आयुक्तपदी महिला अधिकारी मिळाल्या आहेत.

नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांच विभागीय आयुक्तपदी महिला अधिकारी मिळाल्या आहेत.
वर्मा या मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. प्राजक्ता लवंगारे- वर्मा या २००१ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे २००३ मध्ये काम करीत असताना महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला १७ लाखांचे पहिले बक्षिस मिळाले. २००९ मध्ये धुळे जिल्हाधिकारी असताना धवल भारती अभियान राबवून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे म्हणून प्रयत्न केले. सिडकोमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांचे गावठाणासह यशस्वी पुनर्वसन कोणताही संघर्ष न होता केले.