शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

व्यवहारवादाचे भयंकर सावट देशावर आहे - रणजित मेश्राम

By आनंद डेकाटे | Published: April 20, 2023 1:02 PM

महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

 नागपूर : विचार, तत्व, प्रणाली यांना कुस्करून केवळ व्यवहारवादाचे स्तोम वाजविण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला होता. आज नेमके तेच भारतात दिसत आहे. आजच्या व्यवहारवादाने इष्ट अनिष्ट कोणतेच वस्त्र अंगावर ठेवलेले नाही. अशातर्हेने विचारसरणीची लढाई लढायला सारेच दुबळे ठरत असतील तर हा नव्या अंधार युगाचा प्रारंभ म्हणता येईल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केले.

महावितरणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी हे होते. यावेळी मंचावर मुख्य अभियंते दिलीप दोडके होते. अभियंते अमित परांजपे, अनिल सहारे, अजय खोब्रागडे, हरिष गजबे, नारायण लोखंडे व महाव्यवस्थापक वित्त शरद दाहेवार हे आवर्जून उपस्थित होते.

रणजित मेश्राम म्हणाले, आर्थिक संरचनेला मुलभूत अधिकारात घ्यावे या बाबासाहेबांच्या वारंवारच्या आग्रहाकडे या देशाने दुर्लक्ष केले. ओबीसी वर्गवारीची जातसूची तयार नसतांना ३४० कलमात संविधानिक तरतूद करुन देण्याला ओबीसींनी दुर्लक्ष केले. अशा बऱ्याच अनुल्लेखित व दुर्लक्षित घटनांचा यावेळी आपल्या भाषणातून आढावा घेतला.अध्यक्ष स्थानावरुन सुहास रंगारी यांनी प्रजा व नागरिक यातील भेद स्पष्ट केला. शिवाय, विविध प्रसंग व उदाहरणे सांगून बाबासाहेबांप्रती आपली कतज्ञता व्यक्त केली. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक सुशांत श्रृंगारे, संचालन बंडू शंभरकर व निशा चौधरी यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर