शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:00 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटले होते.

नागपूर : उपमुख्यमंत्रीअजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटले होते. पण, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक सूचक विधान केले असून आज नाही पण कधी ना कधी अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

"आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतला. त्यामुळे आम्ही सगळे ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत. भारत जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर चांगलं आणि विकासशील सरकारची गरज आहे", असे पटेल यांनी म्हटले.

तसेच आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललं आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारधारा आणि एवढे सारे लोकांना एकत्रित आणि एकसंघ आणून देशाला चांगला विकल्प देणे ही सोपी गोष्ट नाही. देशाने अनेकवेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. त्यामध्ये १९७७ असो किंवा १९८९ की १९९६ असे अनेक प्रसंग आले. म्हणून एक चांगलं स्थिर सरकार असले पाहिजे. सरकारचा एक चेहरा असला पाहिजे. त्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. म्हणून आम्ही पण अनेक बाबींचा विचार करून एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.  दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार असे विचारले असता त्यांनी म्हटले, "आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? आज अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते." 

टॅग्स :nagpurनागपूरPraful Patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस