नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशनसाठी ‘पोटेन क्रेन’चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:40 IST2018-04-12T21:40:35+5:302018-04-12T21:40:48+5:30
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे. क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीवर कार्य करणे शक्य आहे. बांधकाम क्षेत्रात ही क्रेन उपयोगाची ठरते. क्रेनची उंची सुमारे १२ मजलीच्या घराइतकी आहे. अनेक उंच इमारतीच्या बांधकामात या क्रेनचा उपयोग करण्यात येतो.

नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशनसाठी ‘पोटेन क्रेन’चा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे.
क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीवर कार्य करणे शक्य आहे. बांधकाम क्षेत्रात ही क्रेन उपयोगाची ठरते. क्रेनची उंची सुमारे १२ मजलीच्या घराइतकी आहे. अनेक उंच इमारतीच्या बांधकामात या क्रेनचा उपयोग करण्यात येतो.
क्रेनला आवश्यक इतकी स्थिरता मिळण्याकरिता योग्य ते उपाय केले जातात आणि त्यामुळेच वजनी साहित्य उचलताना क्रेनचा तोल नियंत्रणात राहतो आणि जोखीम राहत नाही. जमिनीवर वजन उचलण्यासाठी क्रेनची क्षमता ५ मेट्रिक टन (५००० किलो) तर उंचीवर क्षमता १.५ मेट्रिक टन (१५०० किलो) आहे. क्रेनच्या वापरामुळे मनुष्यबळ कमी लागते आणि पर्यायाने उंचीवर काम करण्याची जोखीम कमी राहते आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे प्रकल्पाचे काम वेगात होते. या क्रेनचा वापर हिंगणा मार्गावरील बन्सीनगर मेट्रो स्टेशनवर करण्यात येत आहे. अत्यंत वजनी उपकरणे, लोखंडी यंत्रणा किंवा इतर वजनी साहित्य उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येतो.