शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

कोरोनानंतरचे विकार मुलांकरिता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:00 AM

Nagpur News मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी असली तरी, त्यांच्यामधील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. कारण, कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारे विकार मुलांकरिता धोकादायक ठरू शकतात, असे डॉक्टरचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देडॉक्टरनुसार वेळेत लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक

मेहा शर्मा

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले आहे. मुलांमधील कोरोनाची तीव्रता कमी असली तरी, त्यांच्यामधील वाढत्या संक्रमणावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे. कारण, कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारे विकार मुलांकरिता धोकादायक ठरू शकतात, असे डॉक्टरचे म्हणणे आहे.

यासंदर्भात लोकमतशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांनी सांगितले, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुलांमधील संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. त्यांना कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून कोरोनाची लागन होत आहे. मुलांमध्ये बरेचदा लक्षणे दिसत नाहीत किंवा हलका ताप, अतिसार, अशक्तपणा इत्यादी लक्षणे जाणवतात. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी, रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यावरून कोरोनाची तीव्रता कमी असल्याचे स्पष्ट होते. परंतु, मुलांमधील कोरोना संक्रमनापेक्षा कोरोना बरा झाल्यानंतर निर्माण होणारा मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिन्ड्रोम (एमआयएस-सी) जास्त चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनी मुलांमुळे कोरोना झपाट्याने पसरतो अशी माहिती दिली. कोरोना वेगात पसरू नये याकरिता मुलांची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर नागरिकांनी सुरक्षा साधने वापरणे बंद केले. त्यामुळे दुसरी लाट आली. आधी शाळा, पार्क, मैदाने बंद करण्यात आल्यामुळे मुलांचे काेरोनापासून संरक्षण झाले होते. परंतु, आता सर्व उघडण्यात आल्यामुळे आणि पालक बाहेर जायला लागल्याने मुलांमधील कोरोना वाढला आहे. मुलांमधील कोरोना जास्त तीव्र नसला तरी, कोरोना बरा झाल्यानंतर धोकादायक विकार दिसून आले आहेत. कोरोनानंतरच्या एमआयएस-सीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. लवकर निदान झाल्यास पुढील धोका टाळला जाऊ शकतो. ताप, श्वास घेण्यास त्रास, स्ट्रोक या लक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

स्रीरोगतज्ज्ञ डॉ. रूपेश्री भोयर यांनी नवजात बाळांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती दिली. गर्भातील बाळाला कोरोना होण्याचे पुरावे नाहीत. परंतु, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कोरोना रुग्णाकडून कोरोना होऊ शकतो. सुरुवातीला नवजात बाळांना कोरोनाबाधित आईपासून दूर ठेवले जात होते. आता, आवश्यक काळजी घेऊन बाळांना दूध पाजू दिले जाते. नवजात बाळाकरिता आईचे दूध अत्यंत आवश्यक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एमआयएस-सी कसा आहे

१ - मुलांमध्ये दुर्मीळ परिस्थितीत आढळून येतो.

२ - कोरोना बरा झाल्यानंतर २-३ महिन्यांनी दिसतो.

३ - हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदू, त्वचा, डोळे इत्यादी अवयवांना हानिकारक.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस