पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:50+5:302021-04-19T04:07:50+5:30

- उपलब्ध नसल्याचा साईटवर संदेश नागपूर : कोरोना काळात ऑक्सिजन, औषधी आणि बेड उपलब्ध होत नसल्याने विलगीकरणात असणारे रुग्णांचे ...

Of a portable oxygen cylinder | पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची

पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची

- उपलब्ध नसल्याचा साईटवर संदेश

नागपूर : कोरोना काळात ऑक्सिजन, औषधी आणि बेड उपलब्ध होत नसल्याने विलगीकरणात असणारे रुग्णांचे नातेवाईक आणि इतर लोक आवश्यकतेवेळी उपयोगात येण्यासाठी पोेर्टेबल ऑक्सिजनची खरेदी करीत आहेत. त्यातच ऑनलाईन विक्री वाढली आहे. मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांचा स्टॉक संपला आहे. ऑनलाईनवर उपलब्ध नसल्याचे संदेश येत आहेत.

हे उत्पादन जास्त महाग नाहीत. त्यामुळे लोक सहजरीत्या खरेदी करीत आहेत. अनेकांचा सिलिंडर खरेदी करून कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे. या सिलिंडरमुळे कोरोना रुग्णांवर काही प्रमाणात घरीच उपचार करता येऊ शकतो. ऑनलाईन साईटवर ४० ते ५० लिटरचे सिलिंडर हजार ते १२०० रुपयांत उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदी वाढल्याने साईटवर स्टॉक संपल्याची माहिती मिळत आहे. ऑनलाईनमध्ये अनेक प्रकारचे सिलिंडर विविध आकारात आणि किमतीत उपलब्ध आहेत. अशा सिलिंडरची विक्री करणाऱ्या कंपन्या नवी दिल्ली आणि गुडगाव येथील आहेत.

गेल्यावर्षी पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची घरूनच विक्री करणारी प्रांजल तिडके म्हणाली, गेल्यावर्षी कोरोना काळात सिलिंडरची मागणी होती. ७०० ते ८०० रुपयांत विक्री व्हायची. पण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर विक्री बंद झाली. त्यामुळे चार महिने ४० पेक्षा जास्त पोेर्टेबल सिलिंडर विक्रीविना पडून होते. त्यामुळे हा व्यवसाय बंद केला. हे सिलिंडर फार कमी विकतात. पण आता पुन्हा सिलिंडरला मागणी वाढली आहे. पण आता दिल्ली येथील कंपन्या पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडरची किट पाठविण्यास तयार नाही. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध राहतील, पण तेव्हा विक्री होणार नाही. आता सिलिंडरसाठी दररोज विचारणा होत आहे.

Web Title: Of a portable oxygen cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.