शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

पॉर्न, गेम आणि ब्लॅकमेलिंग : ऑनलाइन जगाचे व्यसन की मृत्यूचा खेळ?

By सुनील चरपे | Updated: September 1, 2025 15:55 IST

Nagpur : अलीकडे ग्रामीण भागात अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी आत्महत्या का केल्या? किंवा त्यांच्या व इतरांच्या मनात एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याचा विचार का येतो? याच्या मुळाशी जाण्याचा फारसा कुणी प्रयत्न करीत नाही.

सुनील चरपेनागपूर : असा प्रयत्न कुणी केला तर त्यावर विश्वास ठेवला जात नाही. अलीकडच्या काळात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश सर्वजणांचे मोबाइल फोनवर राहण्याचा वेळ व प्रमाण वाढले आहे. यातूनच अनेक जण ऑनलाइन गेम, रील्स व इतर आक्षेपार्ह बाबींमध्ये गुंतले आणि गुरफटत गेले आहेत. पुढे याच सवयी त्यांच्या एकाकीपण, विचारांची घुसमट आणि आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येते...

अलीकडे ग्रामीण भागात अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी आत्महत्या का केल्या? किंवा त्यांच्या व इतरांच्या मनात एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याचा विचार का येतो? याच्या मुळाशी जाण्याचा फारसा कुणी प्रयत्न करीत नाही.

मूलभूत सुविधांचा अभावया आत्महत्यांची प्रकरणे पोलिसांत जातात; पण तपासात फार काही निष्पन्न होत नाही. देशात इंटरनेट व सोशल मीडियाचे जाळे विणले गेले हे खरे आहे; पण आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक व शिक्षा करणे, या व तत्सम सायबर क्राइमला कायमचा आळा घालण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि या घटनांचा गांभीर्याने तपास करण्याची इच्छाशक्ती यंत्रणेकडे आज तरी नाही.

समस्यांचा जन्मअल्पवयीन मुले-मुली, तरुण-तरुणींमध्ये मोबाइल फोनचे प्रचंड आकर्षण आहे. ही मंडळी त्यांचा फावला वेळ आणि इतर महत्त्वाच्या कामांमधून वेळ काढून मोबाइलवर त्यांच्या आवडीच्या गोष्टी शोधतात व बघतात. यातून अनेकांना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन जडते. काही ऑनलाइन गेम साधे आहेत; पण पब्जी व तत्सम गेम अनेकजण एकाच वेळी खेळतात आणि आपसांत संभाषणदेखील करतात. हे गेम खेळणाऱ्यांच्या मनाचा हळूहळू ताबा घेतात आणि तिथून नवीन समस्यांचा जन्म होतो.

मानसिक दडपण व एकाकीपणापब्जी व तत्सम गेममध्ये अनेक स्टेजेस आहेत. हे गेम खेळणाऱ्या व्यक्तींच्या डोक्यात त्या गेमचे २४ तास विचार घोळत असतात. यांतील एका विशिष्ट स्टेजमध्ये खेळणाऱ्या व्यक्तीला गेममधून बाहेर पडणे शक्य होत नाही. इतर ऑनलाइन असलेले गेम खेळणारे त्याच्यावर नको त्या प्रकारच्या, नको त्या शब्दांमध्ये कमेंट्स करतात. ती व्यक्ती अपयश सहन करू शकत नाही व ते कुणाला सांगूही शकत नाही.

सेक्सटॉर्शन

  • काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, 'सेक्सटॉर्शन' ही बाब प्रकर्षाने पुढे आली. कमी वयात सेक्सबाबत अधिक आकर्षण असणे, हे स्वाभाविक व नैसर्गिक आहे.
  • काहींना मोबाइल फोनवर पॉर्न क्लिप बघण्याची सवय जडते, तर काही विद्यार्थी सोशल मीडिया प्लॅटफार्मवर सुंदर तरुणींचे फोटो बघून काहींच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्या मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण होते. सुरुवातीचे त्यांचे साधे संभाषण नंतर व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचते.
  • त्यांना न्यूड क्लिप दाखवून आपण तरुणी असल्याचे भासवले जाते. ही मुले त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे एकांतात अंगावरचे कपडे काढतात.
  • एकदा ही मुले नग्नावस्थेत त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली की त्याच्या व्हिडीओ एडिटिंगद्वारे क्लिप तयार करून ब्लॅकमेल करीत मोठ्या रकमेची मागणी करणे, पैसे न दिल्यास कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांना सांगण्याची धमकी देणे, प्रसंगी त्या क्लिप व्हायरल करणे असले प्रकार आत्महत्यांना कारणीभूत ठरतात.

 

टॅग्स :onlineऑनलाइनInternetइंटरनेटMental Health Tipsमानसिक आरोग्य