शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

आर्थिक सुधारणांसाठी राजकीय एकमत व्हावे : वीरप्पा मोईली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 9:13 PM

‘जीएसटी’, नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दरात घट झाल्यामुळे एकीकडे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

ठळक मुद्देन्यायपालिकेतील वाद बाहेर येणे अयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जीएसटी’, नोटाबंदीनंतर आर्थिक विकास दरात घट झाल्यामुळे एकीकडे काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री डॉ.एम.वीरप्पा मोईली यांनी मात्र देशाला आर्थिक सुधारणा आवश्यक असल्याचे भाष्य केले आहे. आर्थिक सुधारणांशिवाय देश प्रगती करणार नाही व यासाठी राजकीय एकमत व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.डॉ. एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समिती (वित्त) यांनी सोमवारी नागपूरला भेट दिली. यानंतर खा.अजय संचेती यांच्या निवासस्थानी डॉ.मोईली यांच्यासमवेत समितीच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. १९९१ साली देशात पहिली आर्थिक सुधारणा झाली व त्यानंतर देशात चांगला विकास झाला. मागील चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या  आर्थिक सुधारणांसंदर्भात पावले उचलण्यात येत आहेत. याची देशाला आवश्यकता आहे. एका रात्रीत बदल होणार नाही. ही मोठी प्रक्रिया आहे व यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे, असे डॉ.मोईली म्हणाले. ‘इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी कोड’ सुधारणा विधेयकामुळे कर्जबुडव्यांवर चाप बसणार आहे. या विधेयकामुळे एक नवीन प्रक्रिया तर सुरू झाली आहे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी समितीचे सदस्य खा.निशिकांत दुबे, बी.मेहताब, शिवकुमार उदासी हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय संचेती यांच्या निवासस्थानी खा.बंडारु दत्तात्रेय, खा.चंद्रकांत खैरे, डॉ.महेंद्र प्रसाद, मलाथी मोईली, पी.सी.गड्डीगौडकर, वेंकटेश बाबू यांनीदेखील भेट दिली.न्यायाधीशांमधील वाद दुर्दैवीसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात घेतलेल्या भूमिकेसंदर्भात डॉ.मोईली यांनी आपले मत मांडले. न्यायपालिकेतील वाद अशा पद्धतीने बाहेर येणे दुर्दैवी आहे. हे सर्व न्यायाधीश अतिशय प्रामाणिक व समर्पित आहेत. परंतु असे व्हायला नको होते. जर अंतर्गत वाद असतील त्यांना सोडविण्यासाठी सरन्यायाधीशांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ.मोईली म्हणाले. या प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याच्या मुद्याचे त्यांनी खंडन करीत आपल्या देशाच्या न्यायपालिकेचा जगभरात आदर कायम आहे, असे प्रतिपादन केले.‘पाँझी’ योजनांविरोधात येणार विधेयकदेशभरात आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘पाँझी’ योजना व ‘चिटफंड’ योजनांचे जाळे पसरले आहे. कायद्यात तरतूद नसल्यामुळे या योजनांमध्ये पैसे गमाविल्यानंतर गुंतवणूकदारांना कुठलीही सुरक्षा राहत नाही. त्यामुळेच ही बाब कायदेशीर कक्षेत आणण्यासाठी व अशा योजनांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती डॉ.वीरप्पा मोईली व बी.मेहताब यांनी दिली.कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीतदेशातील शेतकरी अडचणीत आहे व त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी समग्र दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. केवळ कर्जमाफी करून किंवा ‘पॅकेज’जाहीर करून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. तर यासाठी सर्वसमावेशक असे धोरण जाहीर करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात उच्चपातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती डॉ.मोईली यांनी दिली.

 

टॅग्स :nagpurनागपूर