शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

डोनाल्ड ट्रम्पसारखे राजकीय नेते दहशतवाद्यांहून धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:28 AM

उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे राजकीय नेते हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक झाले आहेत, या शब्दांत अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर, लेखक व न्यूक्लिअर स्टडीज् इन्स्टिट्यूटचे संचालक पीटर कुझनिक यांनी राजकारण्यांवर टीका केली.

ठळक मुद्देअमेरिकन संशोधक पीटर कुझनिक यांची टीका : जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे राजकीय नेते हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक झाले आहेत, या शब्दांत अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर, लेखक व न्यूक्लिअर स्टडीज् इन्स्टिट्यूटचे संचालक पीटर कुझनिक यांनी राजकारण्यांवर टीका केली.पीटर कुझनिक हे सपत्निक नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टिळक पत्रकार भवनात त्यांनी गुरुवारी ‘मीट द प्रेस’च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपरिपक्वतेमुळे जगात युद्धाचे ढग दाटले आहे. जगात आजच्या घडीला १४ हजार ७०० आण्विक शस्त्रे आहेत. यापैकी ९३ टक्के शस्त्रे ही अमेरिका व रशिया यांच्या ताब्यात आहेत. हिरोशिमा व नागासाकी येथील संहार अजूनही लोक विसरलेले नाहीत. आता जर आण्विक युद्ध झाले तर त्याहून कितीतरी अधिक पटींनी नुकसान होईल व लाखो लोक एका क्षणात बेचिराख होतील, अशी भीती कुझनिक यांनी व्यक्त केली. यावेळी कामगारनेते जे.नारायण राव हेदेखील उपस्थित होते.ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे दुर्दैवडोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, हे दुर्दैवच आहे, अशी खंत कुझनिक यांनी बोलून दाखविली. ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड घटली आहे. अगदी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातदेखील त्यांच्या विरोधात नाराजी आहे. ते मानसिकरीत्या आजारी असल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून पुढेदेखील आले आहे. त्यांना विजयी करण्यासाठी रशियातून पैशांचा पुरवठा झाला होता. त्यांची एकूण कारकीर्द लक्षात घेता पुढील निवडणुकांत ‘रिपब्लिक’ पक्षाचा सफाया होईल, असा अंदाज पीटर कुझनिक यांनी वर्तवला.जगातील निवडणुकांत अमेरिकेचा हस्तक्षेपअमेरिकेच्या ‘सीआयए’ व इतर गुप्तचर संस्थांकडून इतर देशांमध्ये हस्तक्षेप जास्त प्रमाणात वाढला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमधील निवडणुकांत या संस्थांचा हस्तक्षेप असतो व राजकीय पटलांवरील बदलदेखील ते घडवून आणत असतात, असा आरोप कुझनिक यांनी केला.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पnagpurनागपूर