प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:47 AM2020-11-17T10:47:00+5:302020-11-17T10:47:26+5:30

Nagpur News Temple शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

‘Political’ credit for opening places of worship; BJP-Sena clash | प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ

प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ

Next
ठळक मुद्देकुठे महाआरती तर कुठे आनंदोत्सव 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘लॉकडाऊन’नंतर महाराष्ट्रात सोमवारी प्रथमच धार्मिकस्थळे उघडण्यात आली. शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेनेतर्फे महाआरती तर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला व प्रार्थनास्थळांचे श्रेय लाटण्याची चढाओढ सामान्यांनादेखील दिसून आली.

टेकडी गणेश मंदिरात शिवसेनाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या वेळी महाआरती केली व तेथे पोहोचलेल्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले. याचप्रकारे सूर्यनगरस्थित दुर्गा मंदिर, गरीब नवाजनगर येथील शीतला माता मंदिर, राममंदिर, तेलंगखेडी हनुमान मंदिर आणि नागमंदिर येथेदेखील महाआरती करण्यात आली. यात पक्षाचे संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी आणि दीपक कापसे, संघटक विशाल बरबटे, किशोर पराते, मंगेश काशीकर, मंगला गवरे, गुड्डू रहांगडाले, बंडू तळवेकर, दिगंबर ठाकरे, हितेश यादव, अक्षय मेश्राम, नाना झोडे, संदीप पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.

दुसरीकडे मागील काही दिवसापासून प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिरांसमोर हे आयोजन झाले. आमच्या पक्षाच्या आंदोलनामुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. वर्धा मार्गावरील साईमंदिरासमोर शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, मुन्ना यादव, किशोर वानखेडे, साहेबराव इंगळे इत्यादी उपस्थित होते. तर पोद्दारेश्वर राममंदिरात आरतीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेथे किशोर पालांदूरकर, श्याम चांदेकर, विनायक डेहनकर, ब्रजभूषण शुक्ला उपस्थित होते. भवानी माता मंदिर येथेदेखील जल्लोष करण्यात आला.

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा

दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रार्थनास्थळांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचे भान राहिले नाही. अशास्थितीत जनतेला ते काय संदेश देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: ‘Political’ credit for opening places of worship; BJP-Sena clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर