शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नागपुरात पोलिसांची राष्ट्रीय एकता दौड : न्यायमूर्ती अन् पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:20 AM

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली.

ठळक मुद्देगुलाबी थंडीत अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून शहर आणि ग्रामीण पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली.पोलीस जिमखान्यापासून सुरू झालेल्या या दौडीच्या प्रारंभी मुख्य अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. झेड. ए. हक, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, अतिरिक्त आयुक्त बी. बी. गायकवाड उपस्थित होते. त्यांनी हवेत बलून सोडून दौडला सुरुवात केली. विशेष म्हणजे, ५ किलोमीटर दौडीत स्वत: न्या. हक, डॉ. उपाध्याय, प्रसन्ना, गायकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त विनीता साहू, उपायुक्त गजानन राजमाने, उपायुक्त विक्रम साळी, उपायुक्त चिन्मय पंडित सहभागी झाले होते. गुलाबी थंडीत पोलीस बॅण्डच्या गजराने दौडीला प्रारंभ झाला. त्यात पोलीस तसेच विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येत तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पोलीस जिमखाना, लेडीज क्लब, लॉ कॉलेज चौक, भोेले पेट्रोल पंप, जीपीओ चौक, जपानी गार्डन, रामगिरी ते पुन्हा जिमखाना असा दौडीचा मार्ग होता.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तnagpurनागपूर