शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आयुक्तांचा पोलीस बदली दरबार : अनेकांना पसंतीनुसार नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:25 AM

शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बहुतांश जणांना त्यांच्या इच्छेनुसार त्या त्या ठिकाणी नियुक्ती दिली.

ठळक मुद्देबदल्यांची पारदर्शी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बहुतांश जणांना त्यांच्या इच्छेनुसार त्या त्या ठिकाणी नियुक्ती दिली.शहर पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पारदर्शी प्रक्रिया पार पडली आहे.पोलीस शिपाई, नायक, हवालदार आणि सहायक फौजदार या पदावर काम करणाºया पोलिसांना एका ठिकाणी जास्तीत जास्त पाच वर्ष सेवा देता येते. त्यानंतर त्यांची बदली केली जाते. मात्र मलईचे स्थान मिळाल्यामुळे बदली होऊनही अनेक जण त्याच ठिकाणी चिटकून बसतात तर बदली झाल्यानंतर चांगले ठिकाण मिळाले नसल्याची कुरकूर करत अनेक जण बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. रुजू झाले तरी इथून लगेच आपली बदली करून घेतात. नऊ हजारांचे संख्याबळ असलेल्या नागपूर शहर पोलीस दलात यावर्षी ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांचा सेवाकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या प्रमुखांना एक पत्र पाठवून १८ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांचा सेवापट पोलीस मुख्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात कुचराई करणाºयावर कारवाईचीही तंबी दिली होती. त्यामुळे बदलीसाठी पात्र पोलीस कर्मचाºयांची यादी पोलीस मुख्यालयात तयार झाली. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या पदानुसार वेळ देऊन पोलीस जिमखान्यात ठरलेल्या वेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे बदली प्रक्रियेत सहभागी असलेल्या या कर्मचाºयांना, लिपिकांना संबंधित सेवापटाची यादी घेऊन हजर राहण्यास सांगितले. पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, प्रभारी सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी सकाळी बदली दरबार सुरू केला. प्रत्येक कर्मचाºयाला तुम्हाला कुठे बदली पाहिजे, असे विचारले जाऊ लागले. कर्मचाºयाने पसंती दर्शविलेल्या ठिकाणी जागा असल्यास तात्काळ नियुक्ती दिली जात होती. रिक्त जागा नसेल तर त्याला दुसरा पर्याय विचारला जात होता. अशाप्रकारे ५२४ ही जणांची त्यांच्या मर्जीनुसार बदली करण्यात आली. अत्यंत पारदर्शीपणे आणि ताबडतोब झालेल्या या बदली प्रक्रियेमुळे बहुतांश पोलीस कर्मचारी समाधान व्यक्त करत होते.रिपीटर्सना ना ।ज्यांनी एका ठिकाणी पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केला अशांनी त्याच ठिकाणी राहण्याची इच्छा व्यक्त करू नये,असे सांगण्यात आले होते.दुसरे म्हणजे, वेगळ्या ठिकाणी नियुक्ती असूनही दुसºया ठिकाणी संलग्न असलेल्यानाही तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले.गुन्हेशाखेसाठी कसोटी!पोलीस दलातील अनेक कर्मचारी गुन्हे शाखेत संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील असतात. या बदली प्रक्रियेत ज्यांनी गुन्हे शाखेत नियुक्ती मागितली त्यांना पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती दिली. तेथे तुमचे काम बघितल्यानंतर गुन्हे शाखेत संधी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयTransferबदली