प्रशांत कोरटकरच्या नागपुरातील घराला पोलीस सुरक्षा, ‘आयपीएस’मित्रवर कारवाई होणार का?  

By योगेश पांडे | Updated: February 25, 2025 22:35 IST2025-02-25T22:35:19+5:302025-02-25T22:35:46+5:30

Nagpur News: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात नागपुरातील प्रशांत कोरटकरने फोन केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police security at Prashant Koratkar's home in Nagpur, will action be taken against 'IPS' friend? | प्रशांत कोरटकरच्या नागपुरातील घराला पोलीस सुरक्षा, ‘आयपीएस’मित्रवर कारवाई होणार का?  

प्रशांत कोरटकरच्या नागपुरातील घराला पोलीस सुरक्षा, ‘आयपीएस’मित्रवर कारवाई होणार का?  

नागपूर -  इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात नागपुरातील प्रशांत कोरटकरने फोन केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी कोरटकरच्या घराला सुरक्षा प्रदान केली आहे. पोलीस विभागाच्या या तत्परतेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही वर्षांअगोदर पत्रकारितेत असलेल्या प्रशांत कोरटकरचे नाव या प्रकरणात आल्यानंतर पोलीस यंत्रणा सरसावली. कोरटकरने आवाज मॉर्फ केल्याचा दावा केला असला तरी कोल्हापुरमध्ये मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट आहे व अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे राजकारणदेखील तापले आहे. एकूणच या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा मार्ग परिसरातील घराला पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था पुरविली आहे. कोरटकरने याबाबत मागणी करण्याअगोदर पोलिसांनी दोन होमगार्ड व दोन पोलीस कॉन्स्टेबलचा बंदोबस्त लावला.

कोरटकरचे राज्यातील अनेक राजकारणी व आयपीएस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत. सोशल माध्यमांवर कोरटकरकडून सातत्याने विविध आयपीएस अधिकारी मित्र, भाऊ असल्याचे फोटो टाकण्यात येतात. त्यामुळे या प्रकरणात पोलिस विभाग कोरटकरविरोधात कारवाई करण्यात येणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, कोरटकरनेदेखील पोलिसांत तक्रार केली आहे. एआयचा वापर करून माझा आवाज वापरण्यात आल्याचा दावा कोरटकरने केला आहे.

Web Title: Police security at Prashant Koratkar's home in Nagpur, will action be taken against 'IPS' friend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.