पोलीस स्मृतिदिन : देशभरातील २६४ शहीद पोलिसांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:20 IST2020-10-21T21:19:00+5:302020-10-21T21:20:32+5:30
264 martyred policemen Saluted, Nagpur Newsयावर्षी देशभरात २६४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. पोलीस विभागातर्फे या शहीद झालेल्या पोलिसांना बुधवारी पोलीस स्मृतिदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली.

पोलीस स्मृतिदिन : देशभरातील २६४ शहीद पोलिसांना मानवंदना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी देशभरात २६४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. पोलीस विभागातर्फे या शहीद झालेल्या पोलिसांना बुधवारी पोलीस स्मृतिदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली. पोलीस मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंडवरील पोलीस स्मृती स्तंभाजवळ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
शहर पोलीस आयुक्तालय व इतर पोलीस घटकांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतिदिन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस हौतात्म्य दिनााचे महत्त्व विशद केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, अप्पर पोलीस आयुक्त डी.के. झलके, नवीनचंद्र रेड्डी, अप्पर आयुक्त गुन्हे सुनील फुलारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाच्या अधीक्षक रेश्मा नांदेडकर, नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, जावेद अहमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व शहीद पोलिसांच्या नावांचे वाचन करण्यात आले.