नागपूर : पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या पाहुण्यांना नागपूर मानवले नसल्याचे दिसत आहे. कारण विधिमंडळ परिसरात लागलेल्या शासकीय दवाखान्यात दोन आठवड्यात ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. यात विविध शासकीय कर्मचारी, पोलीस, परिसरात काम करणारे विधी कर्मचारी यांच्यासोबत आमदार व त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या आरोग्याच्या तपासणीत बहुतांश पोलिसांचे बीपी-शुगर वाढले आहे, तर आमदारांच्या तपासणीत त्यांचा तणाव वाढल्याचे जाणवले आहे.पावसाळी अधिवेशनात येणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन परिसरात छोटेखानी रुग्णालय सुरू केले आहे. येथे पोर्टेबल व्हेंटीलेटर, डी-फीब्रीलेटर, ईसीजी आदीची सोय आहे. रुग्णांवर नि:शुल्क औषधोपचार करण्यात येतात. पावसाळी अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून या रुग्णालयात दररोज २०० रुग्णांची ओपीडी आहे. आतापर्यंत ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे डायरियाचे आहेत. बºयाच जणांना फंगस इन्फेक्शनही झाल्याचे आढळले आहे. अनेकांना गळ्यामध्ये इन्फेक्शन झाले आहे.">या आमदारांचे वाढले टेन्शनमधुकर खडसे, बबन शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण पोटे, हरिभाऊ राठोड, योगेश सागर, जोगेंद्र कवाडे, साहेबराव कांबळे, राजन साळवी, रामचंद्र अवसरे, सुनील शिंदे, मंदा म्हात्रे, नरेंद्र पवारमोठ्या संख्येने आजारी पडण्याला कारण म्हणजे वातावरणाचा परिणाम आहे. आम्ही रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याबरोबर आवश्यक वाटल्यास त्यांना मेयोमध्ये भरती करण्याचीसुद्धा सोय केली आहे.- डॉ. कपिल राऊत, सहयोगी प्राध्यापक
पोलिसांचे बीपी-शुगर तर आमदारांचे वाढले टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:32 IST