नागपुरात विना मास्क फिरणाऱ्या २०२६ जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:32 AM2020-09-13T00:32:17+5:302020-09-13T00:33:38+5:30

शनिवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या २०२६ नागरिकावर पोलिसांनी कारवाई केली.

Police action against 2026 people walking without mask in Nagpur | नागपुरात विना मास्क फिरणाऱ्या २०२६ जणांवर पोलिसांची कारवाई

नागपुरात विना मास्क फिरणाऱ्या २०२६ जणांवर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या २०२६ नागरिकावर पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र त्याला न जुमानता हजारो नागरिक शहरात विनामास्कने फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळपर्यंत वाहतूक शाखा पोलीस तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मास्क न घालता फिरणाऱ्या एकूण २०२६ जणांना पकडले आणि त्यांच्यावर दंडाची कारवाई केली. आज दिवसभरात एकूण चार लाख, ११ हजार, ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मनपाकडून ४६५ नागरिकांना दंड
महापालिकेचे उपद्रव शोध पथक शहारात मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.
जवानांनी शनिवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ४६५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून ९३ हजारांचा दंड वसूल केला. मागील नऊ दिवसात शोध पथकांनी ३ हजार ९६४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन ७ लाख ९२ हजार ८०० चा दंड वसूल केला आहे.
नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाव्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.

नऊ दिवसात झोननिहाय कारवाई
लक्ष्मीनगर - ३१५
धरमपेठ - ९४८
हनुमाननगर - ३००
धंतोली -४१८
नेहरुनगर - २५६
गांधीबाग -२७९
सतरंजीपुरा - २३३
लकडगंज - २५४
आशीनगर - ३९१
मंगळवारी - ५३६
मनपा मुख्यालय - ३४

Web Title: Police action against 2026 people walking without mask in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.