कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 14:11 IST2021-03-15T14:09:37+5:302021-03-15T14:11:25+5:30

Nagpur News कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले.

Poet Bahinabai Chaudhary Former Vice Chancellor of North Maharashtra University Dr. Sudhir Meshram passes away | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. सुधीर मेश्राम यांचे निधन

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले. अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते.

यानंतर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू बनले. त्यांच्या काळात विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता.

Web Title: Poet Bahinabai Chaudhary Former Vice Chancellor of North Maharashtra University Dr. Sudhir Meshram passes away

टॅग्स :Deathमृत्यू