नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 20:33 IST2019-09-03T20:32:26+5:302019-09-03T20:33:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत.

PM to travel to metro in Nagpur | नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार

नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार

ठळक मुद्देमेट्रोच्या सुभाषनगर ते सीताबर्डी मार्गाचे ७ ला लोकार्पण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.३० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. यावेळी सुभाषनगर स्टेशनवर महामेट्रोतर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत.
पूर्वी हा कार्यक्रम कस्तूरचंद पार्कवर होणार होता. पण पावसामुळे कार्यक्रमात बदल करून मानकापूर येथे स्थानांतरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मानकापूर इन्डोर स्टेडियममध्ये जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय एनएचएआय आणि मनपाच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

Web Title: PM to travel to metro in Nagpur