धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाच्या इमारतीवरून पडून प्लम्बरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:35 IST2020-10-31T00:34:20+5:302020-10-31T00:35:57+5:30
Plumber dies falling from Charity Commissioner's office building , Nagpur news धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाच्या इमारतीवरून पडून एका प्लम्बरचा करुण अंत झाला.

धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाच्या इमारतीवरून पडून प्लम्बरचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाच्या इमारतीवरून पडून एका प्लम्बरचा करुण अंत झाला. मुरलीधर काशीनाथ पाल (वय ५५) असे मृताचे नाव असून ते दाभा वस्तीत राहत होते.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर स्लॅबचे पाणी बाहेर काढण्यासाठी २२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ च्या सुमारास मुरलीधर पाल काम करीत होते. पाईप फिटिंग करताना अचानक त्यांचा तोल गेल्यामुळे ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या पाल यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ८.४० च्या सुमारास डॉक्टरांनी पाल यांना मृत घोषित केले. डॉक्टरांकडून मिळालेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.