पेन्शनप्राप्तीचा सेविकांचा आनंद क्षणिक

By Admin | Updated: June 6, 2014 01:02 IST2014-06-06T01:02:03+5:302014-06-06T01:02:03+5:30

पेन्शनप्राप्तीसाठी प्रदीर्घ काळ लढा देणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी शासनाने पेन्शन योजना लागू केली खरी. पण त्याची अंमलबजावणी ३0 एप्रिल २0१४ पासून होणार असल्याने त्यापूर्वी

The pleasure of the pensioner Sevaks is transient | पेन्शनप्राप्तीचा सेविकांचा आनंद क्षणिक

पेन्शनप्राप्तीचा सेविकांचा आनंद क्षणिक

३0 एप्रिलपूर्वी नवृत्त झालेल्यांना फटका
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
पेन्शनप्राप्तीसाठी प्रदीर्घ काळ लढा देणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी  शासनाने पेन्शन योजना लागू केली खरी. पण त्याची  अंमलबजावणी ३0 एप्रिल २0१४ पासून होणार असल्याने त्यापूर्वी नवृत्त होणार्‍यांना त्याचा फायदा होणार नाही.
अलीकडेच यासंदर्भातील एक जी.आर. शासनाने काढला असून त्यात ही बाब नमूद करण्यात आल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.
मानधनात वाढ करावी, पेन्शन लागू करावी या व इतरही मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी यादरम्यान ३१  दिवसांचा संप केला होता. प्रदीर्घ काळ संप चालल्यानंतर सरकारने त्याची दखल घेत मागण्या मान्य केल्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्या  सेवानवृत्त झाल्यानंतर अनुक्रमे १ लाख व ७५ हजार रुपये एक रक्कमी मिळणार आहे. ३0 एप्रिल २0१४  पासून ही योजना लागू करण्यात आली  आहे. त्यामुळे एप्रिलनंतर नवृत्त होणार्‍या अंगणवाडी सेविकांना त्याचा लाभ होणार असला तरी त्यापूर्वी नवृत्त झालेल्या सेविका मात्र यापासून वंचित  राहणार आहे.
विशेष म्हणजे अनेक अंगणवाडी सेविका गेल्या पाच वर्षात नवृत्त झाल्या आहेत. त्यांनी ५0 ते १00 रुपये मानधनापासून काम सुरू केले होते व त्यांना  खर्‍या अर्थाने पेन्शनची गरज होती.  याचा विचारच शासनाने योजना लागू करताना केला नसल्याचे स्पष्ट होते. 
दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संभेच्या सरचिटणीस कमल परुळेकर यांनी शासनाच्या या निर्णयाविरुद्ध पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  तसे पत्रही त्यांनी सेविकांना पाठविले आहे.
 

Web Title: The pleasure of the pensioner Sevaks is transient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.