नागपुरात विमानात तांत्रिक बिघाड, प्रवासी अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:35 IST2020-02-26T00:34:53+5:302020-02-26T00:35:39+5:30
कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.४५ तास अडकून राहावे लागले.

नागपुरात विमानात तांत्रिक बिघाड, प्रवासी अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.४५ तास अडकून राहावे लागले.
मुंबई ते नागपूर आणि नागपूरहून कोलकाताला जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे ६ई-४०३ विमान नागपुरात ठराविक वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता आले. हे विमान सायंकाळी ६ वाजता कोलकाताला रवाना होणार होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे विमान कोलकाताला उडाले नाही. त्यामुळे कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाची वाट पाहणाऱ्या १९९ प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर इंडिगोने या प्रवाशांना इंदूरहून येणाऱ्या ६ई-४३६ या विमानात बसविले. या विमानाने रात्री ८.४० वाजता उड्डाण भरले. विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे अडकून असलेले विमान रात्रीपर्यंत दुरुस्त झाले नाही.