उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:23 IST2020-10-31T00:22:49+5:302020-10-31T00:23:58+5:30
Pink cold begins , Nagpur news उपराजधानीत मागील काही दिवसांपासून रात्री गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. वातावरण कोरडे असल्याने रात्रीचा पारा घसरत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी किमान १८.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.

उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत मागील काही दिवसांपासून रात्री गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. वातावरण कोरडे असल्याने रात्रीचा पारा घसरत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी किमान १८.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. आर्द्रता घटत असल्याने वातावरणातील कोरडेपणा वाढत आहे. ही बाब थंडी वाढण्यासाठी अनुकूल मानली जाते.
शुक्रवारी सकाळी आर्द्रता ६८ टक्के होती तर सायंकाळी ५.३० वाजता हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले होते. हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळीय अवस्था निर्माण होत आहे. ज्याचे परिणाम पुढील दोन दिवसांत दिसून येऊ शकतात. मध्य भारतात पावसाची शक्यता कमी असली तरी ढगांमुळे आर्द्रता वाढू शकते. अशा स्थितीत परत पारा चढेल. दरम्यान, या वर्षी चांगली थंडी पडेल असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.