शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

पाईल्स, फिशरने केली अनेकांची शिकार; अति'काढा'ही ठरला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 10:24 IST

Health Nagpur News पाईल्स व फिशर आजाराच्या रुग्णात १५ टक्के वाढ झाली आहे. उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.

ठळक मुद्दे१५ टक्के रुग्ण वाढलेतरुणांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे. परिणामी, बहुसंख्य लोक घराबाहेर पडत आहेत. विशेषत: आतापर्यंत अंगावर आजार काढलेले रुग्ण डॉक्टरांकडे गर्दी करीत आहेत. यात पाईल्स व फिशर आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. गुदारोग तज्ज्ञ डॉ. नीलेश जुननकर यांच्यानुसार, या आजाराचे १५ टक्के रुग्णात वाढ झाली आहे. याला बैठी जीवनशैली, तिखट व मसालेदार खाद्यपदार्थांचे सेवन, कोरोनाच्या बचावासाठी उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे पाईल्स म्हणजेच मूळव्याधीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शौचाच्या वेळी वेदना होणे, रक्तस्राव होणे, गुदद्वाराचा भाग फुगीर होणे, गाठी निर्माण होणे, ही मूळव्याधीची सर्वसामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या काळातील सुरुवातीचे चार महिने लॉकडाऊन व नंतर पूर्णत: अनलॉक होण्यास आणखी तीन महिन्याचा लागलेल्या कालावधीमुळे बहुसंख्य लोक घरीच होते. त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही, लॅपटॉप, संगणक व मोबाईल पाहण्यात गेला. मूळव्याध हा आजार विशेषकरून बैठेकाम करणाऱ्यांना जास्त होतो. यातच बाहेरून मागविण्यात आलेले तिखट व मसालेदार  व विविध काढ्याच्या अतिसेवनाने या आजाराने अनेकांना विळख्यात घेतले. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण होईल या भीतीने सुरुवातीला बहुसंख्य रुग्णांनी डॉक्टरांकडे जाणे टाळले. काहींनी स्वत:हून औषधी घेतली. परिणामी, आजार वाढल्याची अनेक उदाहरणे असल्याचे डॉ. जुननकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅक्टोबर महिन्याच्या मागील २० दिवसात अनेक रुग्णांनी लेजरद्वारे उपचार करून घेतले आहेत.१८ ते ३५ वयोगटातील सर्वाधिक रुग्णडॉ. जुननकर म्हणाले, एक काळ असा होता की मूळव्याध हा विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारण चाळिशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील स्त्री-पुरुषांनाही मूळव्याध आजार होऊ लागला आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. भारतात आजघडीस सुमारे चार कोटी लोकांना हा आजार आहे. दरवर्षी या आजारात जवळपास १० लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. बदललेले राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे युवावगार्तील मूळव्याधीची मुख्य कारणे आहेत.तंतूमय पदार्थ आहारामध्ये आवश्यकरोजच्या आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये यासारखे तंतूमय पदार्थ आवश्यक असतात. मात्र, आजच्या प्रोसेस्ड फूडच्या काळात आहारातून तंतूमय पदार्थ गायब झाले आहेत आणि त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होत आहे. परिणामी, आपण जे खातो ते सहज पचून जाते व शरीरात तयार होणारी विष्ठा कमी प्रमाणात होते. त्यामुळे शौचाला जाण्याचे प्रमाणही कमी होते. हेच कारण मूळव्याधीला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय, अनैसर्गिक सेक्सही हेही एक कारण आहे.

टॅग्स :Healthआरोग्य