शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मेयोतील पीजीच्या जागा शंभरी गाठणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:41 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ८२ वरून १०० वर पोहचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे‘एमसीआय’ने केली पाहणी : ‘पीएसएम’ विभागाच्या दहा जागा वाढण्याची शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ८२ वरून १०० वर पोहचण्याची शक्यता आहे. गुरुवारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) पथकाने पायाभूत सोयींच्या केलेल्या पाहणीत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे, ‘पीएसएम’ विभागाच्या दहा, ‘फार्मेकोलॉजी’ व ‘मायक्रोबायोलॉजी’ मिळून आठ जागा वाढतील असे, बोलले जात आहे.शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार राज्यात पीजीच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साधारण ८०० जागा प्रस्तावित आहेत. यातील २०० जागा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी असणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव त्या-त्या महाविद्यालयाने आपल्या निकषानुसार ‘एमसीआय’कडे तर आर्थिक दुर्बल घटकाचा वाढीव जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘एमसीआय’च्या दोन सदस्यीय चमूने मेयोची पाहणी केली. मेयोच्या बाह्यरुग्ण विभागापासून ते सर्जिकल कॉम्प्लेक्स, मुला-मुलींचे वसतिगृहांना चमूने भेटी दिल्या. सूत्रानुसार, ही पाहणी ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभाग’ (पीएसएम), औषध निर्माणशास्त्र विभाग (फार्मेकोलॉजी) व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग (मायक्रोबायोलॉजी) विभागाच्या ‘पीजी’च्या जागांसाठी होती. पाहणीनंतर ‘एमसीआय’च्या चमूने संबंधित विभाग प्रमुख व अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे, आपल्या पाहणीत चमूने एकही त्रुटी काढली नाही. यामुळे ‘पीएसएम’ विभागाच्या प्रस्तावित १० जागांसह फार्मेकोलॉजी व मायक्रोबायोलॉजी मिळून आठ जागा वाढण्याची शक्यता आहे, असे झाल्यास मेयोच्या एकूण ८२ जागांवरून १०० जागा होतील.एमआरआय लवकरच रुग्णसेवेत‘एमसीआय’ चमूने सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये स्थापन होत असलेल्या ‘एमआरआय’ यंत्राचीही पाहणी केली. सूत्रानुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत दाखल होण्याची हमी यावेळी मेयो प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय, पुढील महिन्यापर्यंत नवे सीटी स्कॅनही रुग्णसेवेत असणार आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर