नागपुरात पेट्राेल १०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 10:50 IST2021-02-18T10:50:24+5:302021-02-18T10:50:49+5:30
Nagpur News सातत्याने हाेत असलेली पेट्राेल, डिझेलची दरवाढ बुधवारी कायम हाेती आणि यावेळी अखेर पाॅवर पेट्राेलने डाेळे फाडायला लावणारा तीन अंकी आकडा प्राप्त केला.

नागपुरात पेट्राेल १०० पार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात एकीकडे काेराेना ब्लास्ट हाेत असताना पेट्राेलच्या महागाईचाही बुधवारी भडका उडाला. सातत्याने हाेत असलेली पेट्राेल, डिझेलची दरवाढ बुधवारी कायम हाेती आणि यावेळी अखेर पाॅवर पेट्राेलने डाेळे फाडायला लावणारा तीन अंकी आकडा प्राप्त केला.
हाेय, शहरात पेट्राेलच्या दराने सेंच्युरीचा ताे उच्चांकही गाठला. पाॅवर पेट्राेल १००.२६ रुपयावर पाेहचले. मागाेमाग डिझेलनेही शतक ठाेकण्याची स्पर्धा लावली असून, पाॅवर डिझेल म्हणजे टर्बाे डिझेलचे दर नव्या उच्चांकासह ९१.१९ रुपयावर धडकले. तसे शहरात साध्या पेट्राेलनेही शंभरीकडे वाटचाल सुरू केली असून, त्याचे दरही ९६ रुपये ८० पैशावर पाेहचले आहेत, तर साध्या डिझेलचे दरही ८७.८५ रुपयावर धडकलेले आहेत.